शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पाच वडांचं गाव.. पाचवड त्याचं नाव!--नावामागची कहाणी-नऊ

By admin | Updated: March 17, 2015 00:09 IST

अध्यात्मिक परंपरा : भक्कम तटबंदी अन् दगडी घाटांचं देखणं वैभव

राहुल तांबोळी -भुर्इंज पुणे-बंगळूर महामार्गावर कृष्णा नदीकाठी वसलेलं टुमदार पाचवड काळाच्या ओघात मोठ्या बाजारपेठेचं गाव झालं आहे. महामार्गावर दिसत असलेलं पाचवड खरं तर या गावाची बाजारपेठ असून या गावाचं देखणेपण महामार्गापासून काही आतमध्ये नदीकाठी आहे. या नदीच्या काठी पूर्वी असणाऱ्या पाच भल्याथोरल्या वडांच्या झाडांमुळे या गावाला पाचवड हे नाव मिळालं. पाचवड गावाला मोठी अध्यात्मिक परंपरा आहे. ते या गावात प्रवेश करताच जाणवतं. कृष्णा नदीकाठी असणारे भव्य आणि देखणे दगडी घाट या गावाचं वैभव आहे. या परिसरातच पाच वडांची झाडं होती. काळाच्या ओघात काही झाडं नष्ट झाली असली तरी त्या झाडांचे रेखीव दगडातील पार त्या झाडांच्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत.घाटासोबत या गावाला असणारी तटबंदी या गावाचे वेगळेपण दाखवून देते. विशेष म्हणजे या तटबंदीचे आणि तिच्या दरवाजांचे अवशेष अजूनही अस्तित्वात आहेत. आणखीण वैशिष्ट्य म्हणजे गावातील रस्ते पूर्वीच्या काळात मजबूत दगडांच्या साह्याने तयार करण्यात आले होते. आता त्याचे डांबरीकरण केले असले तरी काही ठिकाणी अजूनही मूळ अवशेष दिसून येतात. या गावाची पूर्वीच्या काळातील सांडपाणी व्यवस्थाही किती मजबूत होती हे अजूनही दिसून येते. महामार्ग झाल्यानंतर पाचवड गावाची बाजारपेठ गावापासून काही अंतरावर महामार्गालगत स्थिरावली. वाई, जावळी आणि सातारा तालुक्याचे तीनही रस्ते या ठिकाणी एकत्रित येत असल्याने या बाजारपेठेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.दीड शतकी महोत्सवाची परंपरापाचवड गावाला उज्ज्वल अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. येथे साजरा होणारा कज्जलेश्वर उत्सव यंदा तब्बल १५३ वर्षे पूर्ण करत आहे. या उत्सवात धार्मिक कार्यक्रमासोबत राष्ट्रीय, आंतररष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम गायकांचे गायन, व्याख्यान, विविध स्पर्धा असे कार्यक्रम होत असतात. एखाद्या छोट्या गावात सलग १५३ वर्षे चालणारा असा हा आगळावेगळा महोत्सव हे पाचवड गावचे वैशिष्ट्य आहे. - वैशाली भट गावाला उज्ज्वल वारसासरदार नातू यांना हे गाव इनाम मिळाले होते. त्या काळात या गावात त्यांचे पाच वाडेही होते. सरदार नातूंनीच हे गाव वसवले. येथे बांधण्यात आलेले घाट, मंदिरे, तटबंदी, धर्मशाळा, फारसे कुठे न दिसणारे दगडी रस्ते अशा अनेक कामांत सरदार नातूंचे योगदान आहे. या आगळ््या वेगळ्या योगदानातून या गावाला उज्वला वारसा लाभला असून नंतरच्या काळात ग्रामस्थांनी तो वाढवला. - वसंतराव शेंडे