(चौकट)
राजकीय समीकरणे बदलली
पाचगणी नगरपरिषदेची निवडणूक कधीच पक्षीय पातळीवर लढली गेली नाही. येथे अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवली गेली आहे तर निवडून आल्यानंतर सत्तेची गोळाबेरीज करण्याकरिता आघाडीची मोट बांधली जाते. गेल्या दीड वर्षांच्या कोरोना कालावधीत अनेक राजकीय समीकरणे बदलली. त्याचा परिणाम यंदाच्या निवडणुकीवर होणार आहे. कोरोना काळात ‘कोण आपला आणि कोण परका’ हे जनतेने लक्षात ठेवलं आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्यांना ही निवडणूक सोपी नसणार आहे.
(चौकट)
आता करावी लागणार मजबूत बांधणी
पूर्वी आठ प्रभागांतून निवडणूक लढविली गेली. यामध्ये एका प्रभागात तीन उमेदवार व उर्वरित सात प्रभागांमधून प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले. नगराध्यक्षांची निवडणूक ही थेट जनतेमधून झाली आहे. आता प्रभागपद्धती बंद झाली असून, पुन्हा एकदा वॉर्डरचना अस्तिवात आल्याने उमेदवारांना मजबूत बांधणी करावी लागणार आहे..
(चौकट)
पाच वर्षांतील राजकारणातील दोलायमान परिस्थिती पाहता आगामी निवडणूक सत्ताधाऱ्यांना सोपी नसणार आहे शिवाय राज्यातील सत्ता समीकरणांचादेखील या निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो. सद्य:परिस्थिती पाहता जो-तो निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून स्वत:ची प्रतिमा उजळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
(चौकट)
असे आहे पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी ७
भाजप ३
शिवसेना २
अपक्ष ५
(लोगो : पाचगणी पालिका धुमशान)