शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ओढ्यातून काढला पाचशे ट्रॉली गाळ!

By admin | Updated: September 11, 2016 23:46 IST

कात्रेश्वर मंडळाचा उपक्रम : कातरखटावमधील दुष्काळ हटविण्यासाठी एक पाऊल पुढे

कातरखटाव : ‘केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे’ या प्रमाणे कातरखटाव येथील कात्रेश्वर मंडळाने ‘एक गाव, एक गणपती,’ उपक्रम राबवत गावाला उन्हाळ्यात भेडसावणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मंडळाने जेसीबी, ट्रॅक्टरच्या साह्याने ओढ्यातील पाचशे ट्रॉली गाळ काढला. कात्रेश्वर मंडळाने राबविलेल्या उपक्रमामुळे बंधाऱ्यात जादा पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे. पाच दिवस जेसीबी आणि चार ट्रॅक्टरच्या मदतीने चाललेल्या कामात चारशे ते पाचशे खेपा गाळ उचलला आहे. हा गाळ गरजू शेतक ऱ्यांच्या रानात टाकला आहे. गणेशोत्सवातील वीस हजार मंडळाने सामाजिक बांधिलकी म्हणून वापरला आहे. १९८३ पासून गेली ३३ वर्ष झाली हे मंडळ सामाजिक बांधिलकीसह नवनवीन उपक्रम राबवत आहे. खर्चाला फाटा देत उन्हाळ्यातला पाणी प्रश्न लक्षात घेता ओढ्यातील गाळ काढणे, गरजू रुग्णांना मदत करणे, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्लो सायकल स्पर्धा घेतल्या जातात. वह्या-पुस्तकांचे वाटप केले जाते. कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून कात्रेश्वर बेंगलोर ग्रुप, कात्रेश्वर मुंबई ग्रुप या दोन शाखा निर्माण केले आहेत. (वार्ताहर) डॉल्बीमुक्तीसाठी जनजागृती... कातरखटावसह परिसरातील मंडळांनी ‘डॉल्बीमुक्त मंडळ’ करून एक आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. अन्य मंडळे कर्कश आवाजात गाणी लावून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आवाज वाढवून टाहो फोडताना दिसत आहेत. त्यामुळे भागातील मंडळांनी आदर्श निर्माण करण्याची गरज आहे. कात्रेश्वर मंडळाचा इतरांनी आदर्श घेतल्यास खऱ्या अर्थाने क्रांती घडणार आहे. शैक्षणिक साहित्य... या गणेशोत्सवात आम्ही मंडळाच्या वतीने हायस्कूलच्या मुला-मुलीनां शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार आहोत. मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून लोकसहभागातून जमणाऱ्या निधीतून चांगले उपक्रम राबविले जातील. - विक्रम बागल, अध्यक्ष, कात्रेश्वर मंडळ