शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आधी औषध,मग ‘बांधणी’

By admin | Updated: July 7, 2015 22:21 IST

विवाहितेची फसवणूक : मुलगा होण्यासाठी दाम्पत्याकडून लूट

सातारा : मुलगा होण्यासाठी येथील औद्योगिक वसाहतीजवळील देवऋषी पती-पत्नीने विवाहितेला आधी औषध दिले. ‘गुण’ येत नाही हे बघून ‘बांधणी’चा उपाय शोधला. प्रत्येक टप्प्यावर पैसे घेतले घेतले गेले आणि मुलगा तर झालाच नाही. अखेर या भोंदू दाम्पत्याला कोठडीची हवा खायला लागली.सारिका राकेश मोहिते या विवाहितेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारीत म्हटले आहे की, नंदा वायदंडे (माने) या महिलेशी त्यांची ओळख झाल्यानंतर नंदाने ‘तुला मुलगा नाही का,’ असे विचारले. मुलगा नसल्याचे समजल्यावर नंदाने त्यांना संध्याकाळी घरी बोलावले. संध्याकाळी नंदाने अंगात आणून सारिका यांना सांगितले की, उपाय करण्यासाठी चार हजार रुपये लागतील. नंदाचा पती विठ्ठल वायदंडे हा ‘देवाचं पाहणारा’ म्हणून ओळखला जातो.सारिका त्यांचे सासरे विश्वास मोहिते यांना घेऊन दुसऱ्या दिवशी नंदाकडे गेल्या. तिला चार हजार रुपये दिले. नंदाने त्यांना पांढऱ्या रंगाचे औषध दिले. औषध पिण्याबरोबरच अंगाला लावायलाही सांगितले. परंतु अनेक दिवस औषध घेऊन आणि अंगाला चोळून काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर पुन्हा नंदाची भेट झाल्यावर ‘मला दिवस गेले नाहीत,’ असे सारिका यांनी नंदाला सांगितले. यावेळी नंदाने सारिका यांच्यावर त्यांच्या जावेने करणी केल्याचे कारण सांगितले. त्यासाठी ‘बांधणी’चा तोडगा सुचवला आणि नऊ हजार रुपये मागितले. सारिका यांनी सासऱ्यांबरोबर जाऊन नंदाला सहा हजार रुपये दिले. त्यानंतर एका फडक्यात नारळ, लिंबू आणि हळद-कुंकू अशी ‘बांधणी’ तयार करून नंदा आणि तिच्या पतीने दिली. ही ‘बांधणी’ घराच्या आढ्याला महिनाभर टांगूनही काहीच उपयोग झाला नाही. पुन्हा भेट झाल्यावर नंदाने सारिका यांना घरातील माणसांची माहिती विचारली. सारिका यांची एक जाऊ नांदत नाही, हे समजल्यावर तिला नांदवायला आणण्यासाठी नंदाने चार हजार रुपये मागितले. ‘आता माझ्याकडे पैसे नाहीत,’ असे सारिका यांनी सांगितले असता त्यांच्या कानातील सोन्याचे वेल घेतले. ‘चार-आठ दिवसांनी वेल परत देते,’ असे सांगितले; मात्र पाच महिने झाले तरी परत दिले नाहीत, असे प्रियांका यांनी तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)पोलिसांसमोरच ‘चमत्कार’विठ्ठल आणि नंदा वायदंडे यांना मंगळवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन निरीक्षक पद्माकर घनवट यांच्यासमोर उभे केले. तू ‘देवाचं पाहतोस’ म्हणजे काय करतोस, असे घनवट यांनी विचारले असता विठ्ठलने त्यांना मनातला प्रश्न विचारायला सांगून त्यांच्या टेबलवर गहू पसरले. त्यातील मोजके वेगळे काढले आणि दोन-दोन दाण्यांच्या जोड्या लावल्या. त्या समसंख्येत आल्यावर ‘होय’ असे उत्तर दिले. मग ‘आता तू आत जाणार का,’ असा प्रश्न विचारून गहू पसरायला सांगितले. याही प्रश्नाला त्याने ‘होय’ असे उत्तर दिले.