शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटांसाठी साताऱ्यात पहिली बाजारपेठ

By admin | Updated: January 10, 2017 22:28 IST

वेदांतिकाराजेंचा पुढाकार : बचतगट फेडरेशनमार्फत नवनवीन उद्योग व्यवसायांसाठी मिळणार मोफत प्रशिक्षण

सातारा : महिला सबलीकरणाचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर, बचतगटांना बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळेच राजमाता सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीय स्वयं. महिला बचत गट फेडरेशन बचत गटांच्या मालासाठी साताऱ्यात पहिली हक्काची बाजारपेठ सुरू करत असल्याची घोषणा फेडरेशनच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी केली.शाहूपुरी येथे राजमाता सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीय स्वयं. महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने आयोजित महिला बचत गटांच्या मेळाव्यात वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी फेडरेशनच्या संचालिका लता जाधव, सुदर्शना चव्हाण, संगीता देशमुख, जयश्री पाटील आदी उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संगीता फल्ले, संगीता सपकाळ, मोहिनी चोरगे, उर्मिला कोरडे, उज्ज्वला निकम आणि कबड्डी पंच सायराबानू शेख यांचा वेदांतिकाराजे यांच्या हस्ते सत्कार केला. वेदांतिकाराजे म्हणाल्या, ‘फेडरेशनच्या माध्यमातून साताऱ्यातील पहिला बचत गट बझार सुरू करण्यात येत असून, यादोगोपाळ पेठ येथे हा बझार सुरू होणार आहे. यामध्ये महिला बचत गट आपला माल विक्रीसाठी ठेवतील. त्यासाठी बचत गटांकडे आवश्यक तो परवाना असणे आवश्यक आहे. या बझारमुळे बचतगटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.’सुजीत शेख यांनी सुत्रसंचालन केले. वर्षा आतार यांनी आभार मानले. मेळाव्यास शहरासह तालुक्यातील शेकडो महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)यासाठी मिळणार मोफत प्रशिक्षणवर्तमानपत्राच्या रद्दीतून लिफापे तयार करणे, पोळीभाजी, वडापाव, सामोसा केंद्र चालवणे, सणानुसार रुकवत तयार करणे, पोळी घरपोच देणे, पाळणा घर चालवणे यासारखे पर्याय बचत गटांनी शोधले पाहिजेत, असे पर्याय शोधल्यास बचत गटांना बचतीबरोबरच कायमची बाजार पेठ मिळणार आहे. बचत गटांच्या अडचणी सोडवण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध आहे. विविध प्रकारच्या उत्पादनासाठी महिला बचत गटांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी फेडरेशन मदत करणार असल्याचे वेदांतिकाराजे म्हणाल्या.१७ जानेवारीला हळदी-कुंकूचे आयोजनमकरसंक्रांती सणानिमीत्त वेदांतिकाराजे भोसले यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या असून मंगळवार, दि. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ या कालावधीत सुरुची निवासस्थानी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सातारा शहर आणि तालुक्यातील महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.