शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात कापड दुकानाला आग

By admin | Updated: January 15, 2017 18:35 IST

येथील राजपथावरील मुथा आर्केड इमारतीमधील कापड दुकानाला शॉर्टसर्किटमुळे रविवारी सकाळी भीषण आग

ऑनलाइन लोकमत सातारा, दि. 15 -  येथील राजपथावरील मुथा आर्केड इमारतीमधील कापड दुकानाला शॉर्टसर्किटमुळे रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुमारे साडेतीन तासांनंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमक दलाला यश आले.मोती चौकापासून जवळच असलेल्या मुथा आर्केड या इमारतीच्या बेसमेंटला १३ दुकान गाळे आहेत. यामध्ये एक कापड दुकान आहे. या दुकानाला रविवारी सकाळी सात वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. रस्त्यावर धूर आल्यानंतर ही आगीची घटना लोकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर अग्निशमक दलाला याची माहिती देण्यात आली. अजिंक्यतारा कारखान्यावरील दोन आणि सातारा पालिकेचे दोन असे चार अग्निशमक बंब घटनास्थळी पंधरा मिनिटांतच पोहोचले. कापड दुकान बेसमेंटला असल्यामुळे धूर मोठ्या प्रमाणात बाहेर येत होता. त्यामुळे आग विझविण्यात अडचणी येत होत्या. मात्र, तरीही अग्निशमक दलाचे जवान पाण्याचे फवारे मारून आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. पाण्याचे फवारे मारल्यामुळे बेसमेंटचा व्हरांडा पाण्याने भरला. भर मोती चौकात आग लागल्याचे समजताच सकाळी-सकाळी ही आग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनी मोती चौकातील वाहतूक बंद केली होती. अग्निशमक दलाने सतत पाण्याचे फवारे मारल्याने सुमारे साडेतीन तासांनंतर आग आटोक्यात आली. दुकानातील सर्व फर्निचर, विविध प्रकारचे कपडे असा सुमारे पाच लाखांचा ऐवज या आगीीत जळून खाक झाला. या दुकानाच्या शेजारी असलेल्या चार दुकान गाळ्यांनाही आगीची झळ बसली. मात्र, यामध्ये त्यांचे फारसे नुकसान झाले नाही. नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, नगरसेवक धनंजय जांभळे, कल्याण राक्षे यांनी घटनास्थळी भेट देऊन आग विझविण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. (प्रतिनिधी)पोलिसांची धडपड !आग लागल्याचे समजताच बहुजन क्रांती मोर्चाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सुरुवातीला शेजारील दुकानातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही. अग्निशमक दल येईपर्यंत पोलिसांचे प्रयत्न सुरूच होते.