शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दगडाचे कण रगडता मुबलक वाळू मिळे

By admin | Updated: August 14, 2014 22:38 IST

बांधकाम क्षेत्रात नदीच्या वाळूपेक्षा दगडाच्या वाळूस अधिक पसंती

वाठार स्टेशन : बांधकाम क्षेत्रात सिमेंट, वीट, स्टील, दगड, खडी या पेक्षाही वाळूची गरज मोठी असते; परंतु सध्या ही नदीची वाळू मिळवणे कठीण बाब व खर्चाची बाब झाल्याने या वाळूऐवजी आता दगडाच्या वाळूचा (स्टोन क्रश) सर्वच बांधकाम व्यावसायिकांनी पसंती दिली आहे. यामुळे भविष्यात नदीच्या वाळूस दगडाची वाळू हा सर्वोत्तम पर्याय ठरणार का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.घर बांधकामाबरोबरच, पाणलोट बंधारे, सिमेंट बंधारे यासाठी वाळूची गरज लागते. मात्र, सध्या वाळूचे वाढलेले दर यामुळे ही वाळूखरेदी करणे व साठा करणे ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. याऐवजी वाळूच्या निम्म्या खर्चातच दगडाची वाळू मिळत असून, नदी वाळूपेक्षाही या वाळूचे काम भक्क्म व मजबूत होत असल्याचे बांधकाम व्यावसायिक सांगतात.नदीची वाळू ही माताड येत असल्याने बांधकामासाठी प्लास्टरला तडे जाण्याचे प्रकार वाढत आहे. याशिवाय वाळूतील मातीच्या कणामुळे सिमेंटही ज्यादा वापरावे लागते. यापेक्षा दगड वाळूत केलेले बांधकाम हे भक्कम असल्याचे पुरावेही बांधकाम व्यावसायिक देत आहेत.मात्र, नदीच्या एक ब्रास वाळूसाठी ४७०० ते ५००० पर्यंत रक्कम मोजावी लागते. तर दगडाच्या वाळूसाठी २५०० ते २७०० रुपये लागतात हा विचार करता जवळपास ५० टक्के खर्चाची यामधून बचत होत असल्याने बांधकामाचा खर्च ही कमी होतो. पर्यायाने घरांच्या किमतीही यामुळे कमी होतात. याचा फायदाही सर्वसामान्याला होतो.जिल्ह्यातील अनेक स्टोन क्रशर्समधून ही दगड वाळू आता जिल्हाभर उपलब्ध होत असल्याने भविष्यातील बांधकाम क्षेत्रात नदीच्या वाळूस दगडाची वाळू हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. (वार्ताहर)स्टोन क्रशर्स मधील दगडवाळू ही बांधकामास योग्य असून, या प्रक्रियेत जो दगड यासाठी वापरात येतो तो दगड जितका कठीण असेल त्याची वाळूही चांगल्या दर्जाची असून, ते बांधकामही भक्कम होते. दोन्ही वाळूतील दरांचा व भक्कमतेचा विचार केल्यास दगड वाळू हीच चांगली आहे. - शशिकांत धुमाळ, सिव्हिल इंजिनिअर