शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर साईडपट्ट्यांवर पडला मुरूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST

खंडाळा : सार्वजनिक बांधकाम विभागाने खंडाळा-लोणंद रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले. मात्र रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या साईडपट्ट्यांवर टाकलेले मुरूमाचे ढिगारे ...

खंडाळा : सार्वजनिक बांधकाम विभागाने खंडाळा-लोणंद रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले. मात्र रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या साईडपट्ट्यांवर टाकलेले मुरूमाचे ढिगारे तसेच असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर संबंधित ठेकेदाराने साईडपट्ट्यांवर मुरूम पसरण्याचे काम सुरू केले आहे. या समस्येवर मार्ग निघाल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

खंडाळा ते लोणंद रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या भरण्यासाठी ठेकेदारांनी मुरूमाचे ढीग जागोजागी टाकले आहेत. गेल्या महिनाभरात हा मुरूम पसरला नसल्याने तसेच ढीग बाजूला होते. यातील काही मुरूम रस्त्यावरही पडला होता. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून छोटे - मोठे अपघात होत होते. तसेच परिसरातील ग्रामस्थांना शेतात आणि विविध कामांना जाण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नव्हती. रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणारी वाहने जात असल्याने जीविताला धोका वाढला होता. त्यातच तालुक्यात रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या तीन पादचाऱ्यांना एका वाहनाने ठोकरल्याने त्यांना नाहक प्राण गमवावे लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

शाळा सुरू झाल्याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांनाही अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रस्त्याच्या बाजूचा मुरूम पसरून रस्ता सुरक्षित करावा, अशी जनतेची मागणी ‘लोकमत’ने उचलून धरली होती. त्याची दखल घेऊन बांधकाम विभागाने ठेकेदाराला तातडीने हे काम करण्यास भाग पाडले.

(कोट)

खंडाळा-लोणंद रस्त्याच्या बाजूने मुरूमाचे पडलेले ढीग पसरले नसल्याने अपघातांची मालिका सुरू होती. त्याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत होता. रस्ता वाहतूक सुरक्षित करण्यासाठी हे काम तातडीने करावे, ही मागणी ‘लोकमत’ने प्रभावीपणे मांडली. त्यामुळे काम सुरू झाले. याबाबत समाधान वाटते .

- महेश राऊत, ग्रामस्थ, म्हावशी

फोटो : १० खंडाळा

खंडाळा-लोणंद मार्गावरील साईडपट्ट्या भरण्याचे काम बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. (छाया : दशरथ ननावरे)

लोगो : लोकमत फॉलोअप