शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

अखेर डाव मांडला..‘कॅप्टन’ची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:41 IST

सातारा : सातारा नगरपालिकेचा कारभार सध्या सुरू आहे तसाच सुरू राहिला तर आपली काही डाळ शिजणार नाही. याची जाणीव ...

सातारा : सातारा नगरपालिकेचा कारभार सध्या सुरू आहे तसाच सुरू राहिला तर आपली काही डाळ शिजणार नाही. याची जाणीव झालेल्या अनेकांना पोटशूळ उठलाय. नियमातून काम होणार नाही म्हटल्यावर नगराध्यक्षांनाच दूर करण्याची खेळी पुन्हा एकदा खेळली गेली. कूल कॅप्टन सहज आऊट होणार नाहीत म्हटल्यावर त्यांना धावचित करण्याचा खेळ खेळला जातोय; पण मॅच जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात आलेल्या कॅप्टनला सहज धावबाद करणेही सोपे नाही. त्यासाठी संघ सूत्रधारांकडेच कॅप्टननी डाव सोडावा, यासाठी इतर खेळाडूंनी बांधणी केली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सातारा विकास आघाडीतील नगरसेवक आणि नगराध्यक्षांमध्ये रुसवे फुगवे सुरू आहेत. ठराविक नगरसेवकांची कामे होतात आणि ठराविकांची होत नाहीत, अशी तक्रार करून आघाडी प्रमुखांनीच याबाबत निर्णय घेण्याची विनंतीकरण्यात आली. त्यामुळे कामांसाठी आग्रही असलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी नगराध्यक्षांनाही सुनावत ‘असे चालणार नाही. कामकरायचे नसेल तर राजीनामा देऊन मोकळे व्हा,’ असे खडे बोल सुनावले. यामुळे दुखावलेल्या नगराध्यक्षांनी सर्वांची इच्छा असेल तसेच होईल, अशी अगतिकता दाखविली; पण प्रत्यक्षात त्यांना आणि इतरांनाही हे सहज होणार नाही, याची जाणीव आहे.शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये नगरसेवकांच्या कामांचा समावेश केला जात नाही, असा आरोप नगराध्यक्षांवर लावला जात असला तरी त्यांनी प्रत्येक नगरसेवकाला समान न्याय कसा मिळेल, याचे नियोजन केले आहे; पण इथे समान न्याय कोणाला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या प्रभागातच जास्तीत जास्त कामे व्हावीत, असे वाटणार. ही सहज भावना असली तरी देखील मुद्दाम काही विषय पत्रिकेमध्ये घुसण्याचा प्रयत्न सुरू असतो. त्याला यश येत नसल्यामुळेच नगराध्यक्षांच्या तक्रारींबद्दलचा सूर वाढत आहे; पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, एखाद्या प्रमुखाविरोधात तक्रारी वाढू लागल्या की तो योग्य मार्गावर आहे आणि योग्य निर्णय घेत आहे, असे समजायला हरकत नाही; पण सातारा पालिकेच्या आणि नगराध्यक्षांच्या बाबतीत तसे होताना दिसत नाही.नगराध्यक्षांच्या उपस्थितीतच काहींना नगरपालिका स्वत:ला चालवायची आहे. आपण सांगू त्याप्रमाणे नगराध्यक्षांनी निर्णय घ्यावेत. आपल्या हो ला हो करावे आणि चुकीचे होत असले तरी गप्प राहावे. या अपेक्षा सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांच्या आहेत. त्यामुळे कामही करता येत नाही आणि गप्पही राहता येत नाही, अशी अवस्था नगराध्यक्षांची झाली आहे; पण सध्या सर्व टीमच विरोधात असल्याने सामना कसा जिंकायचा? हाच प्रश्न नगराध्यक्षांपुढे पडला आहे. एक-एक धाव करत उद्दिष्टापर्यंत पोहोचायचे की डाव घोषित करून टाकायचा, या विवंचनेत नगराध्यक्ष आहेत.सामना नगरपालिकेतील असो किंवा मैदानातील... जेव्हा लढण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा विरोधी संघातील खेळाडू असोत किंवा आपल्याच संघातील. कधी गुगली पडते तर कधी शेवटच्या चेंडूवरही षटकार बसतो आणि सामना पूर्णपणे फिरतो. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत आशा सोडायची नसते. मैदानावरील खेळाचा हा नियम सर्वत्रच लागू पडतो. त्यामुळे कोणाच्याही दबावाला किंवा आव्हानाला धैर्याने सामोरे जाणे आणि काही प्रमाणात जुळवून घेत आपला डाव पूर्ण करावाच लागणार आहे. हार-जीतचा निर्णय काळ ठरवेल त्यासाठी आत्ताच हताश होऊन चालणार नाही.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्र राहून निवडणुकीसाठी काम करावे, अशी खासदार उदयनराजेंची अपेक्षा असणार. त्यासाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये समन्वय साधण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्नही केला. एकत्र या, चांगली कामे करा, अशा सूचनाही केल्या. कधी कानउघडणी सुद्धा केली; पण त्याचा फार काही फरक पडलेला दिसत नाही. ज्यांच्यामुळे सत्ता मिळाली, पदे मिळाली त्यांच्यासाठी आता काम करण्याची वेळ आली आहे. त्याच दृष्टिकोनातून काहींना कायम पदभार दिला तर काहींची नव्याने पदरचना करण्याचे नियोजन केले जात आहे.पालिकेचे कारभारी नेमके कोणसातारा नगरपालिकेत नगराध्यक्ष या केवळ कठपुतली असतील आणि कारभार दुसरेच करतील, अशी शक्यता निवडणुकीच्या सुरुवातीलाच वर्तविण्यात आली होती. ते खरे करण्याचा प्रयत्न नगरपालिकेत सुरू आहे; पण ‘असे होणार नाही,’ असे नगराध्यक्षांनी दिलेले आश्वासन त्यांना पाळावे लागेल. कारभाऱ्यांना बाजूला सारून आपला अजेंडा राबवावा लागेल. काही झाले तरी जनतेची फसवणूक होणार नाही, याबाबत सजग राहावे लागेल.नेते कोण अन् मुजरा कोणाला?पालिकेचे राजे आपणच आहोत, अशा अविर्भावात काहीजणांचा पालिकेत वावर आहे. त्यामुळे काही नगरसेवकही पालिकेतील राजेंना मुजरा करूनच कामकाजाला सुरुवात करतात. ज्यांना लोकांनी पालिकेत निवडून देणे टाळले, ते मागील दाराने आले आणि तिखट झाले. तर विद्यमान पदाधिकाºयांना आपले पद कधीही जाऊ शकते, याची भीती सतत सतावत आहे. आपल्यावर मेहरनजर राहावी, यासाठी ही मुजºयाची उठाठेव आहे.