शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

मेडिकल कॉलेजसाठी अंतिम परवानगी द्यावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:44 IST

कऱ्हाड : सातारा मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयार असलेल्या पर्यायी ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा राज्य ...

कऱ्हाड : सातारा मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयार असलेल्या पर्यायी ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या. मात्र, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पाहणी दौऱ्याअभावी ही प्रवेश प्रक्रिया प्रलंबित राहिली आहे. त्यामुळे पाहणी करून त्यासाठी आवश्यक असणारी अंतिम परवानगी तातडीने द्यावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे केली.

लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी खासदार श्रीनिवास पाटील हे सध्या दिल्ली येथे असून, सातारा मेडिकल कॉलेजबाबत त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेतली.

यावेळी खासदार पाटील म्हणाले, सातारा मेडिकल कॉलेजसाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून, त्यासाठी ४९५ कोटींचा भरीव निधी व ६२ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॉलेजसाठी मंजूर असलेल्या जागेवर इमारत बांधली जाणार असून, त्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे. येत्या काही दिवसात मेडिकल कॉलेजची भव्य आणि सुसज्ज इमारत उभी राहील. मात्र तोपर्यंत कॉलेजची प्रवेश प्रक्रिया रखडू नये, कॉलेज प्रत्यक्ष सुरु व्हावे यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सातारा येथे तयार असलेल्या पर्यायी इमारतीत कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या लागणाऱ्या सर्व पायाभूत सोयीसुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.

या कॉलेजमध्ये शंभर एमबीबीएस विद्यार्थ्यांची पहिली तुकडी शैक्षणिक वर्ष २०२१पासून सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी लेक्चर रूम, स्किल लॅब आणि सेंट्रल रिसर्च लॅबसह चार प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररीसह केंद्रीय ग्रंथालय, मुला-मुलींसाठी वसतिगृह सुविधा, खेळाचे मैदान आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय राज्य सरकारने केंद्रीय प्रयोगशाळेच्या विकासासाठी तेरा कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच इतर अध्यापन सुविधांसाठी सर्व प्रथम वर्षांच्या प्रयोगशाळेच्या उपकरणे खरेदीसाठी साडेसहा कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. मात्र, मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने पाहणी करून आवश्यक परवानगी देणे आवश्यक आहे. केंद्रीय पातळीवरील संबंधित परवानगी तातडीने द्यावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे भेटीदरम्यान केली आहे.