शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या तीन योजनांना अखेर मान्यता

By admin | Updated: November 16, 2014 00:04 IST

८५ लाखांची तरतूद : कडबाकुट्टी, झेरॉक्स यंत्रणा, तीन चाकी मोटारसायकलचा मार्ग सुकर

सातारा : निसर्गाने अन्याय केलेल्या अपंगांचे जगणे सुकर व्हावे, यासाठी शासनातर्फे विविध योजना आणल्या जातात. मात्र, सातारा जिल्हा परिषदेतील समाजकल्याण कार्यालयाकडून अपंगांसाठी चार योजना आणल्या होत्या. त्या कागदी घोड्यात अडकले होते. या योजनेच्या मान्यतेचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला. त्यामुळे ८५ लाखांच्या तीन योजनांचा मार्ग सुकर झाला आहे.जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील अपंगांसाठी काही योजना आणल्या आहेत. यामध्ये पंचायत समितीकडून पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवून घेण्यात येणार आहेत. यासाठी कडबाकुट्टी, झेरॉक्स मशीन, तीनचाकी मोटारसायकल तसेच घरकुल योजनांचा समावेश होता. यासाठी एक कोटी ६५ लाखांची तरतूद केली होती. ही योजना पहिल्यांदाच राबविली जात असल्याने तिच्या तांत्रिक मंजुरीसाठी अपंग कल्याण आयुक्तांकडे पाठविली होती. त्यामुळे तांत्रिक अडचणीत ही योजना बारगळली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने दि. २९ आॅक्टोबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोईनकर तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी स्वाती इथापे यांनी पुणे आयुक्त कार्यालयात पाठपुरावा केला. यासंदर्भात बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतूनही मंजुरी घेण्यात आली.यामध्ये २५ लाखांची कडबाकुट्टी मशीन, चाळीस लाखांची झेरॉक्स मशीन व वीस लाखांची चारचाकी मोटारसायकल या योजनांना मान्यता देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)