शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण रस्ता ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

By admin | Updated: November 15, 2016 01:02 IST

खंडाळा तालुका : माथाडी आणि जनरल कामागार युनियनचे निवेदन

शिरवळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील चौपाळा याठिकाणी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व रिलायन्स इंफ्राच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य कामगारवर्गाला बसत आहे. औद्योगिक कंपन्यांकडे जाणाऱ्या सेवारस्त्यांचे काम अनेक दिवसांपासून अपूर्णावस्थेत असल्याने याठिकाणी नाईलाजास्तव विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कामगार वर्गाचे अपघात होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. याबाबत अपघातांना जबाबदार धरून संबंधितांवर गुन्हे दाखल करत अपूर्ण सर्व्हिस रस्ता पूर्ण करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खंडाळा तालुका माथाडी आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने खंडाळा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सध्या शिरवळ परिसरात अत्यंत संथगतीने सुरू आहे. याठिकाणी प्रमाणात अनधिकृत रस्ता दुभाजक अज्ञातांनी काढल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या याठिकाणी वाढताना दिसत आहे. दरम्यान, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व रिलायन्स इंफ्राच्या गलथान कारभाराचा फटका शिरवळ भागात असणाऱ्या कंपन्यांमधील सर्वसामान्य कामगारवर्गाला बसत असून, शिरवळजवळील चौपाळा याठिकाणी एका खासगी कंपनीसमोर व एका हॉटेलसमोर गेल्या अनेक दिवसांपासून सर्व्हिस रस्त्यांचे व अर्धवट स्थितीत पुलाचे काम तसेच ठेवण्यात आल्यामुळे याठिकाणी कामगारवर्गाला कंपनीमध्ये जाण्याकरिता विरुद्ध दिशेने कंपनीमध्ये जावे लागते. विरुद्ध दिशेने जात असताना भरधाव वेगाने असलेल्या वाहनांमुळे कामगारांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन कामगारांना जीवालाही मुकावे लागले आहे तर काही कामगारांना कायमचे अपंगत्वही आल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दरम्यान, याबाबत वारंवार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सक्त सूचना देऊनही याकडे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व रिलायन्स इंफ्राकडून कानाडोळा करण्यात येत आहे. कंपन्यांमध्ये जाण्यासाठी लवकर येथील सर्व्हिस रस्त्यांचे व अर्धवट स्थितीत असलेल्या पुलाचे काम संबंधितांनी करावे, अशी मागणी कामगारवर्गाने केली असता या मागणीलाही संबंधितांनी वाटाण्याच्या अक्षदा लावल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अपघातांना जवाबदार असणाऱ्या या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करून सेवा रस्त्यांचे काम पूर्ण करावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांच्या वतीने देण्यात आला आहे. (वार्ताहर)... अन्यथा आंदोलन करणार शिरवळजवळील चौपाळा याठिकाणी कामगारवर्गाला जाण्याकरिता सर्व्हिस रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व रिलायन्स इंफ्राने न केल्यास खंडाळा तालुका माथाडी आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने खंडाळा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. याप्रसंगी निवेदन देताना अध्यक्ष अमीरभाई काझी, सचिव दत्तात्रय ऊर्फ बंडू ढमाळ ,सदस्य मतीन शेख आदी कामगार वर्ग उपस्थित होते.