शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडप्रकरणी मिळकतधारकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

महाबळेश्वर : विल्सन पॉईंटजवळ असलेल्या बेलमाउंट सोसायटीतील प्लॉट नं. सातमध्ये झालेल्या वृक्षतोडीची पालिकेने गंभीर दखल घेतली. याप्रकरणी संबंधित मिळकतधारकांवर ...

महाबळेश्वर : विल्सन पॉईंटजवळ असलेल्या बेलमाउंट सोसायटीतील प्लॉट नं. सातमध्ये झालेल्या वृक्षतोडीची पालिकेने गंभीर दखल घेतली. याप्रकरणी संबंधित मिळकतधारकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय हरित लवादाने २००६ मध्ये झालेल्या वनसदृश मिळकतींचा सर्व्हे पुन्हा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार महाबळेश्वर तालुक्यात वनसदृश मिळकतींची पाहणी सुरू आहे. यासाठी प्रत्यक्ष व ड्रोनच्या मदतीने पाहणी केली जाते. सॅटेलाईट इमेजेसच्या आधारे मिळकत वनसदृश आहे का नाही याबाबत निर्णय घेतला जातो. आपली मिळकत ड्रोनमध्ये वनसदृश दिसू नये यासाठी विल्सन पॉईंटजवळील एका मिळकतधारकांनी विविध जातींच्या तीस मोठ्या वृक्षांची तोड केली. वृक्षतोडीच्या पुराव्यांची मिळकतधारकांनी तातडीने विल्हेवाट लावली व येथे काहीच झाले नाही असे वातावरण तयार केले.

ही माहिती मिळताच वनसदृश मिळकतींची पाहणी करणारे पथक त्या ठिकाणी पोहोचले. मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पाहणी करून वृक्षतोडीचा पंचनामा करून मिळकतधारकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेचे वृक्ष अधिकारी कल्याण हिवरे यांनी पंचनामा केला. यामध्ये २००६ मध्ये केलेल्या वृक्ष गणनेत व आता मिळकतीत असलेल्या वृक्षांच्या संख्येत तफावत आढळत होती. यावेळी तीस वृक्षांची कत्तल केल्याचे निदर्शनास आले. यामध्ये जांभुळ तेरा, अंजन नऊ, मेडसिंग सहा व भोमा जातीच्या दोन वृक्षांचा समावेश आहे. निसर्ग संपदेची हानी मिळकतधारकांनी केल्याने पालिकेने त्यांना तातडीने नोटीस बजावली व वृक्षतोडीचा परवाना सादर करण्याची सूचना केली.

मुदतीत मिळकतधारकांनी कोणत्याही प्रकारचा वृक्षतोडीचा परवाना न दिल्याने पालिकेने संबंधित मिळकतधारकांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. पालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्यांनी शनिवारी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात वृक्षतोडीस जबाबदार धरून मिळकतधारक रॉबिन कुमार, अनिल कुमार, एस. एच. सोमाणी व सुधीर मंगळवेढेकर (सर्व रा. पुणे) यांच्या विरोधात महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.