शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कटगुणला आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:40 IST

सातारा : खटाव तालुक्यातील कटगुण येथे आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने पाहणी सुरू केली असून, ...

सातारा : खटाव तालुक्यातील कटगुण येथे आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने पाहणी सुरू केली असून, नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविले आहेत. तर लोणंदमधील मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील अन्य काही अहवालांची प्रतीक्षा आहे. हृ

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत माण तालुक्यातील दोन गावांत तर खंडाळा आणि कºहाड तालुक्यातील प्रत्येकी एका गावांत मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. यामधील खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडी आणि माणमधील हिंगणी व बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. असे असतानाच खटाव तालुक्यातील कटगुणमध्ये शनिवारी काही कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. तसेच त्यांच्या अंगावर वणही होते. त्यामुळे मुंगसाच्या हल्ल्यात या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. असे असतानाच रविवारी आणखी काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी कटगुणला पोहोचले. त्याठिकाणी अधिक माहिती घेत सर्वेक्षण सुरू केले. तसेच मृत कोंबड्यांचे नमूने बर्ड फ्लूच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, दहा दिवसांपूर्वी लोणंद येथे मृत कावळे आढळले होते. या कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह म्हणून आला आहे. पण, लोणंद परिसरातील मरिआईचीवाडीतील मृत कोंबड्यांचा अहवाल बाधित आल्यानंतर या परिसरातच संक्रमित झोन जाहीर करण्यात आला होता. तसेच सर्वेक्षण करून उपाययोजना सुरू करण्यात आल्या होत्या.

चौकट :

शिरवळ, तडवळेसह अन्य अहवालाची प्रतीक्षा...

जिल्ह्यातील शिरवळ, भिलार, मलवडी आणि तडवळेमधील मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांची प्रतीक्षा आहे, तर जावळी तालुक्यातील कुडाळमधील मृत कोंबड्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होईल, अशी माहिती संबंधितांनी दिली.

.......................................................