शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाकडून वडिलांचा खून

By admin | Updated: September 29, 2014 00:51 IST

उपळवे येथील घटना : दांडक्याने जबर मारहाण; फलटण पोलिसांकडून अटक

फलटण : उपळवे (ता. फलटण) येथे किरकोळ कारणावरून दांडक्याने जबर मारहाण करून एका शिक्षकाने आपल्या वडिलांचाच खून केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी शिक्षक सूर्यकांत लंभाते याला फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोकासन (ता. माण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सूर्यकांत सोपान लंभाते (वय ३५) हा शिक्षक आहे. त्याचे मूळगाव उपळवे आहे. तेथे आई, वडील, भाऊ आणि चुलते राहतात. आई-वडिलांची भांडणे होत असल्याने त्याने सहा महिन्यांपूर्वी आईला दहिवडी येथे नेले आहे. त्यामुळे वडील सोपान लंभाते (७७) हे एकटेच राहात होते. ‘माझा मुलगा माझ्या बायकोला घेऊन गेला आहे. मला एकट्याला सर्व कामे करावी लागत आहेत. आता मी नातवाला खलास करणार.’ असे सोपान लंभाते हे कोणास तरी म्हणाले होते. याचा जाब विचारण्यासाठी आज, रविवारी सुटी असल्याने सकाळीच सूर्यकांत हा उपळवे येथे आला. त्याने आपल्या बहिणींनाही बोलावून घेतले होते. बोलता-बोलता वाद इतका टोकाला गेला की, सूर्यकांतने घरातील लाकडी दांडक्याने वडील सोपान यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत सोपान लंभाते खाली पडले ते उठलेच नाहीत. त्यानंतर सूर्यकांत हा घरातून निघून गेला. दरम्यान, त्याचा भाऊ वडिलांना बघायला आला असता, ते निपचीत पडल्याचे दिसून आले. सोपान लंभाते यांचे पत्नीशी पटत नव्हते. त्यांचा घटस्फोटही झाला होता. मात्र, ते परत एकत्र आले होते. ग्रामीण पोलिसांनी शिक्षक सूर्यकांत लंभातेला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप अधिक तपास करीत आहेत.