शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी मातीत मोरांसाठी उभारले शेतकऱ्याने अन्नछत्र !

By admin | Updated: June 26, 2016 00:33 IST

म्हसवडमध्ये मायेचा ओलावा : सर्जेराव माने यांच्या शेतात सहा वर्षांपासून मोर, लांडोरसह इतर पक्ष्यांची हजेरी

सचिन मंगरुळे / म्हसवड दुष्काळी माण तालुक्यातील माणसांबरोबरच पशुपक्ष्यांनाही चोचभर पाण्यासाठी, अन्नासाठी भटकंती करावी लागते. मोर व इतर पक्ष्यांचे अन्न व पाण्यासाठी सुरू असलेले हाल येथील प्रगतशील शेतकरी व माजी नगरसेवक सर्जेराव माने यांनी पाहिले अन् त्यांनी शेतात मोरांसाठी अन्नछत्रच सुरू केले. याठिकाणी गेल्या सहा वर्षांपासून मोर, लांडोर व इतर शेकडो पक्षी सकाळी व सायंकाळी हजेरी लावतात. सर्जेराव माने हे धार्मिक वृत्तीचे आहेत. शहर परिसरातील गोर-गरिबांच्या कसल्याही अडचणी असतील तर सर्जेराव माने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात. ते माणसाबरोबरच पशुपक्ष्यांचीही काळजी घेतात. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर त्यांची शेती आहे. या परिसरात मोरांची पूर्वीपासून मोठी संख्या होती. परंतु गत सहा-सात वर्षांपासून मोरांची संख्या घटत चालल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब माने यांना खटकली. त्यातून त्यांनी २०१० पासून शेतात दोन ठिकाणी मोरांसाठी अन्न व पिण्याच्या पाण्याची दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोय केली. याठिकाणी दररोज दहा किलो धान्य यामध्ये गहू, तांदूळ, हरभरा, मका, ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या शेंगा अशा विविध धान्यांचे मिश्रण व पिण्यासाठी पाणी ठेवण्यात येते. याठिकाणी अनेक मोर, लांडोरसह इतर पक्षीही मोठ्या संख्येने येतात. गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेले अन्नछत्र आजही अखंडपणे सुरू आहे. यामुळे या परिसरात मोरांची व इतर पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.