शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

कालेच्या मूर्तिकलेला लागली उतरती कळा

By admin | Updated: January 2, 2015 00:23 IST

महागाईचा फटका : परराज्यातून येणाऱ्या दगडाचे दर दुप्पट; मूर्तींची मागणी मात्र निम्म्यावर, मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ

काले : काले गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कला म्हणजेच मूर्तिकला़ दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळापासून येथील मूर्तिकार मूर्ती घडविण्याचे काम करीत आहेत़ या मूर्तींना महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही मागणी असते़ मात्र, दगडाच्या किमती वाढल्याने व मूर्तींची मागणीही घटल्याने ही कला धोक्यात आली आहे.काले गावाच्या प्रवेशद्वारावरच मूर्तिकार मूर्ती बनविण्यात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळते. येथे तयार केलेल्या मूर्तींना महाराष्ट्रातील मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांसह कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यांतही मागणी आहे; पण हीच मूर्तिकला आज संकटात सापडली आहे़ इतर व्यवसायांप्रमाणे मूर्तिकला व्यवसायालाही महागाईचा फटका बसला आहे़ कच्च्या मालाच्या म्हणजेच दगडांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, कुशल व सुबक काम करणाऱ्या मजुरांच्या अभावामुळे मूर्तिकलेला घरघर लागली आहे.मूर्ती घडवण्यासाठी परराज्यातून दगड आणावा लागतो़ कर्नाटकमधून शाळीग्राम, काळा पाषाण व गोकाकमधून लालदगड आणि राजस्थानमधून मार्बल आणले जाते़ ट्रकद्वारे हे दगड आणले जातात़ दहा टन वजनाच्या दगडासाठी तब्बल साठ हजार रुपये द्यावे लागतात आणि ही रक्कम अ‍ॅडव्हान्स द्यावी लागते़ त्यामुळे मूर्ती व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते. याआधी दहा टनांसाठी वीस ते तीस हजार रुपये द्यावे लागत होते; आता मात्र तब्बल दुप्पट रक्कम गुंतवावी लागते़ यामुळे भांडवल उभारताना मूर्तिकारांच्या नाकी नऊ येत आहेत. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही; पण हेच घाव घालताना मूर्तिकारांच्या हाताला आलेले फोड कुणाला दिसत नाहीत़ मूर्तिकारांच्या हाताची अवस्था अतिशय बिकट होते़ शिवाय वाकून काम केल्याने पाठदुखीचाही त्रास उद्भवतो. ग्रॅन्डरच्या वापरावेळी दगडाचे कण शरीरात जाण्याने अनेक आजार होतात़ अशा अवस्थेतही अतिशय अल्प मोबदल्यात काम करून मूर्तिकार आपला उदरनिर्वाह करतात़ आजची आधुनिक पिढी मोबाईलच्या वॉलपेपरवरूनच देवदर्शन करत आहेत़ लोकांना धकाधकीच्या जीवनात देवळात जायला वेळ मिळत नाही़ त्यामुळे मंदिरे उभारण्याचे प्रमाणही कमी होत आहे़ एकूणच मूर्तीची मागणीही घटली आहे़ दगडाचे वाढलेले दर आणि मूर्तींची घटलेली मागणी, अशा बिकट अवस्थेतही मूर्तिकार आपली कला जोपासत आहेत़ (वार्ताहर)दोन फूट मूर्तीचा खर्च दहा हजारदोन फूट उंचीची दगडाची मूर्ती बनविण्यासाठी सुमारे दहा हजार रुपये खर्च येतो. त्यामध्ये दगड दोन हजार रुपये, मजुरी सहा हजार रुपये, नक्षीकाम ५५० रुपये, चेहरा ४५० रुपये, फिनिशिंग ५०० रुपये, सॅम्पल ५०० रुपये असा सर्व खर्च दहा हजार रुपये होते. मात्र, मूर्तीची विक्री फक्त अकरा ते बारा हजारांमध्ये होते. आमची चौथी पिढी या व्यवसायात आहे़ दिवसेंदिवस मूर्तींची मागणी घटत आहे़, तर दगडाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत़ कसे तरी उदरनिर्वाहापुरते उत्पन्न मिळते; परंतु मूर्तिकला जोपासण्याच्याा समाधानासाठी हा व्यवसाय नेटाने करत आहे़ - पांडुरंग पाटील, मूर्तिकार