शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढ निश्चित पण.. इलेक्शन के बाद !

By admin | Updated: September 10, 2016 00:37 IST

उपनगरांच्या निवडणुका पुढील वर्षी : ‘लोकमत’च्या विशेष वृत्तानंतर खलबते सुरू; उपनगरांना नगराध्यक्षपदासाठी पाच वर्षे वाट पाहावी लागणार

सातारा : साताऱ्याच्या हद्दवाढीला मुख्यमंत्र्यांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पालिका वर्तुळात आता राजकीय खलबते सुरू झाली आहेत. हद्दवाढीची अधिसूचना जानेवारीत निघणार असल्याने नव्याने समाविष्ट झालेल्या उपनगरांशिवाय पालिकेची निवडणूक होणार आहे. मात्र हद्दवाढ झाल्यानंतर २०१७ मध्ये वाढीव उपनगरांच्या प्रभागातील निवडणुका घेतल्या जाणार आहेत.गेल्या अनेक महिन्यांपासून धुळखात कोनाड्यात पडलेल्या सातारा हद्दवाढीच्या प्रस्तावावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केल्याने हद्दवाढीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नवीन रचनेनुसार सातारा पालिकेमध्ये २० प्रभाग आणि ४० वॉर्ड आहेत. पालिकेची निवडणूक होण्यापूर्वी शाहूपुरी, शाहूनगर, कोडोली, गोडोली आणि खेड या उपनगरांचा समावेश सातारा पालिकेच्या हद्दीत झाला असता तर नव्या रचनेनुसार ५० नगरसेवक पालिकेत समाविष्ट झाले असते. मात्र, हद्दवाढ लांबल्याने पूर्वीपासून जो भाग पालिकेत समाविष्ट आहे. त्या भागातील लोकांना मतदान करता येणार आहे. हद्दवाढीचा अधिकृत अद्यादेश जानेवारी महिन्यात काढण्यात येणार आहे. त्यानंतर हरकतींसाठी महिनाभर मुदत असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी होऊन त्याबाबतचा अहवाल राज्यसरकारकडे पाठविण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत पालिकेची निवडणूक ठरल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे आता जवळपास निश्चीत झाले आहे. तर उपनगरांची निवडणूक हद्दवाढीनंतर घेण्यात येणार आहे. हद्दवाढ झाल्यानंतर नगरपालिकेत कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या भरतीसह अन्य बदल होणार आहेत. डिसेंबर महिन्यात पालिकेची निवडणूक झाल्यानंतर सातारा हद्दीत समाविष्ट होणाऱ्या उपनगरांची पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. मात्र, उपनगराला नगराध्यक्षपद भूषविता येणार नाही. त्यासाठी या उपनगरांना पाच वर्ष वाट पाहावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सातारच्या हद्दीवाढीवर स्वाक्षरी केल्यानंतर उपनगरातील अनेकांनी लवकरात लवकर हरकती मागवाव्यात, अशी मागणी केलीय.सातारची हद्दवाढ भाजमुळेच रखडली गेली, असा सूर उमटू लागला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याच्या हद्दवाढीवर तातडीने निर्णय घेऊन स्वाक्षरी केल्यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली आहे.ही हद्दवाढ आता केंव्हाही झाली तरी चालेल. मात्र मुख्यमंत्र्यांकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळणे गरजेचे होते. या हद्दवाढीमुळे साताऱ्याच्या विकासकामांना गती येणार आहे. (प्रतिनिधी)आता आमची ही शेवटची निवडणूकउपगनगरांमध्ये ग्रामपंचायत असल्यामुळे सदस्यांना चांगला मान असतो. सातारा पालिकेच्या हद्दीत समावेश झाल्यानंतर या लोकांचे महत्त्व कमी होणार आहे. त्यामुळे साताऱ्याची हद्दवाढ पालिकेची निवडणूक झाल्यानंतर होणार असल्याने हा निर्णय ग्रामपंचायत सदस्यांच्या पथ्यावर पडला आहे. हा निर्णय उशिरा झाल्यामुळे ‘बर झालं.. आता आम्हाला ग्रामपंचायत निवडणूक लढविता येईल,’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया सदस्य बोलून दाखवत आहेत.पालिकेत चौकशीसाठी झाली गर्दी... साताऱ्याच्या हद्दवाढीवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाले. त्यानंतर शुक्रवारी याची माहिती घेण्यासाठी नगरसेवकांपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनीच पालिकेत धाव घेतली. कधीपर्यंत हद्दवाढ होणार, नेमकी प्रक्रिया काय आहे. यावरून राजकीय गणिते ठरणार असल्याने हद्दवाढीची चौकशी करण्यासाठी पालिकेत गर्दी झाली होती.