शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

खर्च 150; पावती 33 ची!

By admin | Updated: July 15, 2015 00:21 IST

‘सेतू’च्या हेतूत गोलमाल : उरलेले पैसे कोणाच्या खिशात? विद्यार्थ्यांची अडवणूक

दत्ता यादव - सातारा -नागरिकांना लागणारे विविध दाखले मिळण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्याऱ्या सेतू कार्यालयाच्या ‘हेतू’मध्येच ‘गोलमाल’ असल्याची बाबसमोर आली आहे. सरसकट दाखल्यांना ३३ रुपयांची पावती दिली जात आहे. मात्र प्रत्येक्षात विद्यार्थ्यांकडून शंभर ते दीडशे रुपये जादा उकळले जात आहेत. सर्वसामान्यांची दिवसाढवळ्या लूट होत असताना तहसील कार्यालयातील वरिष्ठ मात्र मुग गिळून गप्प असल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.शालेय, महाविद्यालयीन व इतर विविध कामांसाठी लागणारे दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयात नागरिकांची नेहमीच गर्दी होत असते. मात्र, ही गर्दी सेतू कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पत्यावर पडत आहे. कार्यालयात प्रचंड गर्दी होत असल्याने जो-तो वेळ वाचावा आणि लवकर काम होण्यासाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतायेत हे पाहात नाही. शिवाय पावती व्यतिरिक्त जादा पैसे घेतले तरी कोणी तक्रार करणार, अशी मानसिकता येथील कर्मचाऱ्यांची झाल्याने दिवसाढवळ्या विद्यार्थी व सर्वसामान्यांची लूट केली जात आहे.सर्व दाखले एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली. मात्र तीन ठिकाणच्या खिडक्यांजवळ जाऊन पूर्वीप्रमाणेच आतल्या हाताने पैसे द्यावे लागत आहे. त्यामुळे एक खिडकी योजना केवळ नावापुरतीच उरली आहे. विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखल हवा असतो. त्यामुळे सध्या सेतू कार्यालयात बहुतांशकरून विद्यार्थ्यांच रांगेमध्ये उभे राहिलेले पाहिला मिळाले. त्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता अनेकांनी उत्पन्नाचा दाखल आणण्यासाठी येथे आलो असल्याचे सांगितले.एका विद्यार्थ्याला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी या कार्यालयात १३५ रुपये खर्च आला. तर दुसऱ्या विद्यार्थ्याला याच दाखल्यासाठी ७५ रुपये खर्च आला. हा एवढा खर्च कसा? असे त्यांना विचारल्यानंतर त्याने गमतीशीर माहिती देत शासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. तो विद्यार्र्थी म्हणाला, सुरूवातीला दहा रुपयांचा फॉर्म घेतला. त्यानंतर हा फॉर्म भरून घेण्यासाठी मागच्या साहेबांकडे गेलो. येथे त्यांनी ३० रुपये घेतले. त्यानंतर ‘मागच्या शेड’मध्ये गेलो. तेथे पन्नास रुपये घेतले. परत सेतू कार्यालयातील खिडकी नंबर दोन येथे आलो. येथे ४५ रुपये दिले. परंतु त्यानंतर मला केवळ ३३ रुपयांची पावती हातात देण्यात आली. प्रत्येक टेबलावर पैसे वाटल्याशीवाय दाखला मिळणार नाही. म्हणून हे पैसे द्यावे लागले. कुणी कितीही काही केले तरी हा भ्रष्टाचार काही थांबणार नाही बघा, असं त्या विद्यार्थ्याने आपली हतबलता दर्शवली. विद्यार्थ्यांना आलेला अनुभव येथे प्रातिनिधीक स्वरूपात मांडला असला तरी अशा प्रकारचा अनुभव सेतू कार्यालयात आलेल्या बऱ्याच मुलांना आल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवल्याचे अनेकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगत हतबल होऊन व्यक्त केली. येथे पावती दिली जात नाही ! सेतू कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्येही असाच सावळागोंधळ आहे. कुठल्या कामासाठी किती रक्कम आकारण्यात येते, याचे दर पत्रक भिंतीवर लटकविले आहे. परंतु या दर पत्रकाकडे पहायला विद्यार्थ्यांना वेळ ना स्टॅम्प वेंडरना. येथेही मनमानी पैसे उकळले जात असल्याचा विद्यार्थ्यांकडून आरोप होत आहे. येथे तर कोणतेही काम झाल्यानंतर पावती देणे हा प्रकारच नसल्याचे दिसून आले.सात दिवस होऊन गेले तरी उत्पन्नाचा दाखल मिळाला नाही. उद्या या असे रोज सांगितले जात आहे. हा दाखल काढण्यासाठी माझ्या वडिलांकडून १३५ रुपये घेतले आहेत. मात्र पावती फक्त ३३ रुपयांची दिली आहे.- राजन सराटे कुसवडे ता. सातारा सात दिवसांच्या आत दाखला नेला नाही तर मिळणार नाही, अशी सूचना आहे. दाखला मिळण्याचा कालावधी तीन दिवसांचा असताना सात दिवस झाले तरी आज या उद्या या, असे सांगितले जात आहे. मला पण ३३ रुपयांचीच पावती दिली आहे. - संदीप गायकवाड, म्हसवे जेवढी पावती आहे, तितक्या रकमेची पावती द्यावी, अशा सूचना सेतू कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कालच दिल्या आहेत. परंतु तरीही विद्यार्थ्यांकडून जास्त पैसे घेतले जात असतील तर संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल.- राजेश चव्हाण, तहसीलदार सातारायेथे पावती दिली जात नाही !