शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

थकीत एफआरपी, वीज बिल वसुली विरोधात स्वाभिमानी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:39 IST

सातारा : राज्यातील एक रकमी थकीत ऊस बिल कायदेशीर न मिळाल्याने सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासमोर २५ मार्च रोजी बेमुदत ...

सातारा : राज्यातील एक रकमी थकीत ऊस बिल कायदेशीर न मिळाल्याने सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासमोर २५ मार्च रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिली.

यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कायद्यानुसार एक रकमी दर न देता मोडतोड करून दिल्याने शेतकऱ्यांच्या जीवनमानावर प्रचंड मोठा परिणाम झालेला आहे. पिकविलेल्या उसाचे ऊस बिल कायदेशीर एक रकमी न देता व त्यावरील व्याज न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील चेअरमन असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आदरणीय पी. डी. पाटील यांच्या पुतळ्याजवळ २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून न्याय मिळेपर्यंत सर्व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना बरोबर घेऊन बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे.

अन्यायकारक वीज बिल वसुली विरोधात भव्य रास्ता रोको आंदोलन संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण कंपनीच्या विरोधात व स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने सातारा - कोरेगाव रोडवर महावितरण कार्यालय कृष्णानगर समोर रास्ता रोको आंदोलन शुक्रवार, दि. १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. तरी सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यावसायिक, घरगुती ग्राहक, शेतीपंपधारक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, ॲडव्होकेट विजय चव्हाण, मनोहर येवले यांनी केले आहे.