शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाचा स्वत:च्या विहिरीने घेतला बळी

By admin | Updated: January 9, 2017 22:29 IST

१२ तासांचे शोधकार्य : पिंपोडे बुद्रुक येथे रात्री उशिरा ढिगाऱ्याखालील दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यंत्रणेला यश

वाठार स्टेशन : हवाई दलात नोकरी केल्यानंतर गावाकडे जायचं. शेती करायची अन् शेतकऱ्यांसाठी एखादी नर्सरी काढून मस्त जगायचं, असं छान स्वप्न उराशी बाळगून गेली १२ वर्षांपासून कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक या गावी शेती करत असलेले सेवानिवृत जवान कांतिलाल खाशाबा केंजळे (वय ५५ ) व शेतमजूर विकास मनजी सारोळे (४५) या दोघांचा एका विहिरीने बळी घेतला. ही खळबळजनक घटना रविवारी दुपारी २ वाजता घडली. स्वत:च्या बांधीव विहिरीत पडलेला बोगदा मुजवण्यासाठी लावलेला पत्रा काढत असताना हादरा बसून विहिरीस बांधलेला कमजोर स्लॅब व मातीचा ढिगारा अंगावर कोसळल्याने या ढिगाऱ्याखाली अडकून या माजी जवानासह त्यांच्याकडे शेती करत असलेल्या एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना रविवारी घडला आणि ढिगाऱ्याखालून सोमवारी त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. विहिरीत पडलेल्या ढिगाऱ्याखालील मृतदेह शोधण्यासाठी तब्बल १२ तास ३ पॉकलेन मशीनच्या साह्याने रात्री ३ वाजेपर्यंत हे शोधकार्य सुरू होते.याबाबत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील येळे वस्तीनजीक पाडळ वाट शिवारात येथील कांतिलाल केंजळे यांची स्वत:ची ७० फूट खोल बांधीव विहिर आहे. या विहिरीचे अंदाजे दीड वर्षांपूर्वीच ५० फूट सिमेंट रिंग टाकून बांधकाम केले होते. मात्र, काही महिन्यांपूर्वीच विहिरीतील एका रिंगला चार ते पाच फुटांचा बोगदा पडल्यामुळे कांतिलाल केंजळे यांनी हा बोगदा लोखंडी पत्र्याच्या साह्याने लोखंडी अँगलच्या मदतीने वेल्डिंग करून बसवला होता. मात्र, यातूनही बाहेरील माती विहिरीत पडत असल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी एका बांधकाम ठेकेदाराला हा बोगदा दाखवला होता. यावेळी या बांधकाम ठेकदाराने विहिरीतील बोगद्यावर लावलेला पत्रा काढून घ्या, असे कांतिलाल यांना सांगितले होते. त्यामुळे रविवार, दि. ८ जानेवारी रोजी कांतिलाल व त्यांच्याकडे काम करत असलेला शेतमजूर दुपारी २ वाजता या विहिरीकडे गेले होते. यावेळी विहिरीच्या वरील बाजूस एक पार ठोकून त्यास एक दोरी बांधून कांतिलाल हे विहिरीतील मधोमध असलेल्या बोगद्यावरील पत्रा काढत होते. याच दरम्यान हादरा बसत असल्याने कमकुवत असलेली विहिरीतील रिंग अचानक कोसळली. यावेळी विहिरीवरील बाजूस दोर धरून बसलेला मजूरही यामुळे खाली कोसळल्याने अचानक मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून शेजारी शेतात काम करणाऱ्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. यावेळी मातीचा मोठा ढीग विहिरीत कोसळला गेल्याचे व ढिगाऱ्याखाली कांतिलाल व त्यांचा शेतमजूर अडक ला असल्याची चर्चा वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. याबाबतची माहिती संजय साळुंखे यांनी तत्काळ वाठार पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांना कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली.रविवारी दुपारी ३ वाजल्यापासून या ठिकाणी ३ पॉकलेन मशीनच्या साह्याने विहिरीबाहेर समतल खड्डा काढून विहिरीतिल मातीचा ढिगारा हटवण्याचे काम या मशिनच्या साह्याने पहाटे ३ पर्यंत सुरू होते. पहाटे ३ वाजता दोन्ही मृतदेह आढळून आल्यानंतर हे शोधकार्य थांबवून दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. सोमवारी सकाळी दहा वाजता कांतिलाल केंजळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)