शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

'ईएसआयसी' तील कामगारांनाही मिळणार जनआरोग्य योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सर्वसामान्य कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ, ठाणे यांच्यावतीने कामगारांच्या वैद्यकीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सर्वसामान्य कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ, ठाणे यांच्यावतीने कामगारांच्या वैद्यकीय सोयीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रातील मुंबई दक्षिण, पुणे व कोल्हापूर जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये नोंदणीकृत असलेले कामगार आता प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील संलग्न हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकतील.

यापूर्वी नोंदणीकृत कामगार ईएसएससीच्या रुग्णालयांमध्ये किंवा खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकत होते; परंतु आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील सर्व रुग्णालयांमध्ये त्यांना उपचार घेता येतील. नोंदणीकृत असलेल्या कामगारांना उपचारासाठी खर्चाची मर्यादा नाही.

ईएसआयसीचे पुणे उपविभाग प्रमुख हेमंत कुमार पांडे म्हणाले की, ही सोय ११ जानेवारीपासून कामगारांना लागू झालेली आहे. यासाठी नोंदणीकृत कामगारांनी आपले की पहचान अथवा हेल्थ पासबुक तसेच कोणतेही एक ओळखपत्र जसे आधार, पॅनकार्ड, मतदान कार्ड घेऊन प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या रुग्णालयांमध्ये असलेल्या आरोग्य मित्र व्यक्तीशी संपर्क करावा, आरोग्य मित्र कामगारांचे रजिस्ट्रेशन जनआरोग्य योजनेमध्ये करेल. कामगारांनी आपला मोबाईलसुद्धा यावेळी जवळ ठेवावा. या सुविधा मिळविण्यासाठी कोणतीही रक्कम भरण्याची गरज नाही तसेच कोणत्याही रेफरल लेटरची गरज नाही. परंतु प्राथमिक उपचार ईएसआयसीच्या डिस्पेंसरीमध्ये मिळतील. यासंदर्भात काही अडचणी असल्यास कामगारांनी आपल्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील सलग्न रुग्णालयाची यादी एसएससीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

चौकट

सातारा शहरात ईएसआयसीसाठी सातारा डायग्नोस्टिक सेंटर एकमेव हॉस्पिटल होते. औद्योगिकरण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने कामगारांची संख्या वाढली. ईएसआयसीला या कामगारांचे पैसे वर्ग होतात; मात्र आरोग्यसेवा मर्यादित होती. आता २७ हॉस्पिटल्स उपलब्ध झाल्याने कामगार यांची सोय झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील ही रुग्णालये आहेत संलग्न

दोलताडे हॉस्पिटल, म्हसवड, चिरंजीव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, फलटण, के एम आर एफ एस निकोप हॉस्पिटल, फलटण, फलटण लाईफ लाईन हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, फलटण, सिविल हॉस्पिटल, सातारा, गुजर मेमोरियल हॉस्पिटल, कराड, कॅन्सर सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, सातारा, संजीवन प्रायव्हेट लिमिटेड, सातारा, श्री मंगलमूर्ती क्लिनिक अँड रिसर्च सेंटर, सातारा, यशवंत हॉस्पिटल, सातारा, विजय काटकर हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, वडूज, गीतांजली हॉस्पिटल, वाई, घोटवडेकर हॉस्पिटल, वाई, कोळेकर हॉस्पिटल, कऱ्हाड, कृष्णा हॉस्पिटल, कऱ्हाड, सह्याद्री हॉस्पिटल, कऱ्हाड, सिटी हंड्रेड, कऱ्हाड शारदा क्लिनिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कऱ्हाड, हॉस्पिटल, खंडाळा, पाटील हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, कोरेगाव, कोरेगाव श्रीरंग नर्सिंग होम अँड डायलिसिस सेंटर, कोरेगाव, सावित्री हॉस्पिटल, लोणंद,

हॉस्पिटल म्हसवड.