शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे फिरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 23:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणेच फिरल्याचे आता स्पष्टपणे पुढे आले आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर राष्ट्रवादी-भाजप आघाडीसमोर आता सातारा विकास आघाडी, काँगे्रस आणि शिवसेना यांचे आव्हान पाहायला मिळणार, हे आता स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात मोठा पक्ष असणाºया राष्ट्रवादी काँगे्रसची खेळी न भूतो अशी खेळी करून ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणेच फिरल्याचे आता स्पष्टपणे पुढे आले आहे. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर राष्ट्रवादी-भाजप आघाडीसमोर आता सातारा विकास आघाडी, काँगे्रस आणि शिवसेना यांचे आव्हान पाहायला मिळणार, हे आता स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात मोठा पक्ष असणाºया राष्ट्रवादी काँगे्रसची खेळी न भूतो अशी खेळी करून राज्यात व केंद्रात सत्तेवर असणाºया भारतीय जनता पक्षाशी आघाडी केली. कºहाडात बैठक घेऊन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पालिका, जिल्हा परिषद व नगरपंचायतींमधील सदस्यांना राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या सूचना केल्या होत्या. जिल्हा नियोजन समितीमध्ये स्वबळावर चार जागा निवडून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली होती. याआधीच एक जागा भाजपला बिनविरोध मिळाली. उर्वरित तीन जागेसाठी भाजपची राष्ट्रवादीसोबत बोलणी यशस्वी झाली. सोमवारी मतदान सुरू असतानाच भाजप व राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींची विश्रामगृहावर बैठक पार पडली. यानंतर मतदारांना दोन्ही पक्षांनी निरोप पाठवून निर्णयाबाबत सांगण्यात आले.खासदार उदयनराजे भोसले यांच्या गटासोबत भाजप जाणार नाही, हे सोमवारी स्पष्ट झाले. भाजपने स्वतंत्रपणे येऊन मतदान केले. तर काँगे्रस, सातारा विकास आघाडी व शिवसेनेच्या मतदारांनी एकत्रित येऊन मतदान केले. सातारा विकास आघाडी, काँगे्रस व शिवसेनेची मंडळी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत चर्चा करूनच जिल्हाधिकारी कार्यालयात आले. राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या शासकीय निवासस्थानी चर्चा केली. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सर्व नेतेमंडळींनी मतदारांना सूचना केल्या.शिवसेनेचे आ. शंभूराजे देसाई यांनी जलमंदिरवर जाऊन खा. उदयनराजे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दुपारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला. त्यांच्या वाहनातून आलेल्या महिला सदस्यांनी मतदान केले. या महिला मतदारांना सोडून उदयनराजेंच्या वाहनांचा ताफा तिथून निघून गेला. त्यानंतर वाईचे आमदार मकरंद पाटील हे कार्यकर्त्यांसोबत दाखल झाले. मतदान संपेपर्यंत आमदार पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून होते. यानंतर साताºयाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आले. त्यांनी आमदार मकरंद पाटील यांच्यासोबत चर्चा करीत थांबलेल्या भाजपच्या अनिल देसाई, संदीप शिंदे, मनोज घोरपडे, पालिकेचे गटनेते धनंजय जांभळे यांच्याशी चर्चा केली.पोलिसांचा पहाराजिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी कडा पहारा ठेवला होता. प्रवेशद्वाराच्या आत ५0 फुटावर बॅरिगेटस लावण्यात आले होते. फक्त मतदारांनाच आतमध्ये प्रवेश दिला जात होता. कार्यकर्त्यांना पोलिस बाहेर पिटाळत होते. मतदानप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलिस बंदोबस्त तैनात होता.