शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उद्योजक निर्माण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:38 IST

शिरवळ : ‘तरुणांना त्यांच्या मनातील उद्योग, व्यवसाय उभा करण्यात मदत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुढे सरसावली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी ...

शिरवळ : ‘तरुणांना त्यांच्या मनातील उद्योग, व्यवसाय उभा करण्यात मदत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुढे सरसावली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून आणि प्रदेश सरचिटणीस तुषार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे यांनी दिली.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत काही दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची घोषणा करण्यात आली होती. या अभियानांतर्गत उद्योग-व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची व अनुदानांची माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तरुणांना जो उद्योग - व्यवसाय उभा करायचा आहे, त्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योग - व्यवसायाच्या प्रत्यक्ष क्षेत्र भेटी, प्रकल्प अहवाल, भांडवल उभारणीचे पर्याय, यंत्रसामुग्री आणि पायाभूत सुविधा उभारणी याबाबतचे मार्गदर्शन आणि सहकार्य राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून आगामी वर्षभरात किमान पाचशे उद्योजक तयार करण्याचा मानस आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष सुहास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, प्रदेश निरीक्षक अतुल शिंदे, जिल्हाध्यक्ष डॉ. वैभव कळसे, जिल्हा रोजगार सरचिटणीस सुशांत जाधव व खंडाळा तालुकाध्यक्ष प्रवीण खंडागळे यांनी केले आहे.