शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाची वसना... निधीसाठी याचना !

By admin | Updated: December 29, 2014 23:52 IST

खर्च दुपटीने वाढला : चौदा वर्षांपासून रखडलेली योजना पूर्ण करायाला हवेत अजून ७० कोटी रूपये

पिंपोडे बुद्रुक : उत्तर कोरेगाव तालुक्याच्या कायम दुष्काळी भागाला वरदान ठरणारार वसना उपसा सिंचन योजना प्रकल्प गेल्या चौदा वर्षांपासून रखडला असून त्याच्या पुर्णत्वासाठी अजून किमान ७० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे जात असले तरी सध्या पैसे नसल्याचे कारण देऊन ठेकेदाराने काम बंद ठेवले आहे.वसना योजनेचे सर्वेक्षण अनेकवेळा करण्यात आले. या योजनेचे गाजर दाखवून अनेक निवडणुका लढवल्या गेल्या. त्यामध्ये विधानसभेचे माजी सभापती माजी आमदार दिवंगत शंकरराव जगताप, माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील याांच्यासह माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचाही समावेश होतो.शरद पवार यांच्या मूळ गावी नांदवळ, ता. कोरेगाव येथे दि. ९ मे २००० रोजी मान्यवरांच्या व स्वत: शरद पवारांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र तब्बल साडे चौदा वर्षे झाली तरी अजून या योजनेचा वनवास संपला नाही. ठेकेदाराने २०१२ साजी पहिला टप्पा पूर्ण केला. या योजनेचे जलपूजन आसनगावच्या माळावर तत्कालिन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी २०१३ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालीन जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिले होते. अद्याप दुसरा टप्पा पूर्ण झालेला नाही. पंपहाऊसचे ७५ टक्के तर ऊर्ध्वगामी नलिकेचे ६० टक्के काम झाले आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी ठेकेदारास अजून किमान आठ कोटी रुपये आवश्यक आहेत. (वार्ताहर)पूर्वेकडील गावांचा समावेशाचा प्रश्न प्रलंबितवसना उपसा सिंचन योजना ही उत्तर कोरेगावच्या दुष्काळी भागासाठी प्रामुख्याने सर्वेक्षित करण्यात आली, मात्र वसना नदीच्या पश्मिेकडीलच गावे या योजनेमध्ये समाविष्ठ करण्यात आली. पूर्वेकडील भावेनगर, पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडी, वाठारस्टेशन, तडवळे, सं. वाघोली, फडतरेवाडी, जाधववाडी, विखळे ही गावे कायम दुष्काळीच आहेत. या गावांचा समावेश करण्यासाठी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदने दिली आहेत. मात्र अजून तरी त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. जर या गावांचा समावेश करण्यात आला तर योजनेच्या खर्चातही मोठी वाढ होणार आहे. दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी किमान दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे ठेकेदारानेकाम बंद ठेवले आहे. लवकर निधी उपलब्ध झाला तर मार्च २०१४ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होऊन त्यातील क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल. व्ही. जी. चव्हाण, कार्यकारी अभियंता, वसना उपसा सिंचन योजना ===कोणत्याही परिस्थिती निधी अभावी काम बंद पडणार नाही, लवकरात लवकर योजना पूर्ण करून उत्तर कोरेगावची दुष्काळी शेती ओलिताखाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.दीपक चव्हाण, आमदारवसना योजनेची प्रारंभी ७२ कोटी रुपये प्रकल्प किंमत होती. वाढत्या महागाईमुळे सद्य:स्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास १५० कोटी रुपयांवर खर्च जाण्याची शक्यता आहे. कारण आजपर्यंत झालेल्या कामावर ७० कोटी रुपये खर्च झाला आहे तर अजून ७० कोटींची गरज आहे.