शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक किल्ले वासोटा सर करण्यासाठी बालमावळ्यांचा उत्साह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:12 IST

पेट्री : ऐतिहासिक किल्ले वासोटा पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक व गिरीप्रेमी येतात. काही बालमावळ्यांचा उत्साहदेखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. साताऱ्यातील ...

पेट्री : ऐतिहासिक किल्ले वासोटा पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक व गिरीप्रेमी येतात. काही बालमावळ्यांचा उत्साहदेखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. साताऱ्यातील हेमर चव्हाण या पाच वर्षाच्या चिमुकल्याने मोठ्‌या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज की जय... या घोषणेमुळे आलेल्या उत्साहाच्या बळावर किल्ले वासोटा पूर्णपणे यशस्वीरित्या सर केला. त्याचे गिरीप्रेमींकडून विशेष कौतुक होत होते.

कृपा साळुंके, ऋचा चव्हाण, मनस्वी साळुंके यांनी वासोटा सर केला.

कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वासोटा हा वनदुर्ग. दुर्गप्रेमींचे ट्रेकिंगसाठी आकर्षक ठिकाण म्हणजे ऐतिहासिक किल्ले वासोटा. व्याघ्र प्रकल्प व बामणोली वन्यजीव वनक्षेत्रातील किल्ले वासोटा बफर व कोअर क्षेत्रात येतो. साहसी ट्रेकची आवड असणारे अनेक दुर्गप्रेमींचे आकर्षण. वन खात्याच्या चेकपोस्टपासून पुढे खड्या चढाईने दोन तासांत किल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या संख्येने वासोटा ट्रेकिंगसाठी येत आहेत.

बामणोलीपासून साधारण एक-दीड तास बोटीने प्रवास करून मेट इंदवलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसाठी बांबूचे बॅरिकेट्स तसेच पर्यटक, गिरीप्रेमींची टेम्प्रेचर तपासणी, तद्नंतर पर्यावरणाचा समतोल तसेच वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी सर्व प्रकारच्या प्लास्टिकची नोंद करून वन विभागाच्या परवानगीने दुर्गवारीस सुरुवात होते. शनिवार, रविवारी बहुसंख्य पर्यटक ट्रेकिंगसाठी येताना पाहायला मिळतात.

चोंहोबाजूला दाट हिरवीगार झाडी. त्यात खडतर तसेच पूर्णतः चढ-उतार म्हणजे गिरीप्रेमींसाठी खास पर्वणीच. यामुळे ट्रेकिंगसाठी बहुतांशी पर्यटक या ठिकाणी येतात.

दरम्यान, दीड-दोन तासांचा पायी प्रवास करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय...’, ‘जय भवानी जय शिवाजी...’ अशा घोषणा देत मोठ्‌या उत्साहाने हा किल्ला सर करताना दिसतात. यामध्ये चिमुकल्यांचादेखील उत्साह मोठ्‌या प्रमाणावर दिसून येत होता.

चौकट

खाचखळगे अन् दगडगोटे

अवघा पाच वर्षांचा बालमावळा कोणाच्याही मदतीशिवाय न दमता मोठ्‌या उत्साहाने खाचखळगे, घसरटे दगडगोटे पार करून दोन तास खडी चढाई व दीड तास तीव्र उतार यशस्वीरित्या पार करताना पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होता. दरम्यान, त्याच्यासमवेत सात ते दहा वर्षाच्या तिघी चिमुरड्या यांचेदेखील गिरीप्रेमींकडून प्रेरणा, प्रोत्साहन मिळावे यासाठी टाळ्या वाजवून विशेष कौतुक केले जात होते.

कोट

आतापर्यंत बहुतांशी गडकोट, किल्यांना भेटी दिल्या. परंतु हा ऐतिहासिक वासोटा किल्ला सर करणं म्हणजे मोठं आव्हान होतं. चढताना आमची दमछाक होत होती. परंतु या चिमुकल्या मावळ्‌यांचा उत्साह पाहून त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळत गेली.

- महेंद्र साळुंके,

गिरीप्रेमी मुंबई.

१७किल्ले वासोटा

अवघड असा किल्ले वासोटा पाच वर्षांच्या चिमुरड्यानेही सहज सर केला. (छाया : सागर चव्हाण)