शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविले.. पदपथ बळकावले !

By admin | Updated: May 12, 2016 23:56 IST

बसस्थानकाजवळील प्रकार : बीओटी तत्त्वावर बांधत असलेल्या इमारतीसमोर पदपथावर रेलिंग

सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा शहरातून जाणाऱ्या मार्गाच्या रुंदीकरणात पादचाऱ्यांसाठी नुकत्याच बांधलेल्या पदपथाचे जन्मताच अपहरण झाले आहे. त्याच्या वापराचा पादचाऱ्यांना आनंद मिळण्याआधीच व्यावसायिकांसह बड्या धेंड्यांचीही त्याच्यावर धाड पडल्यामुळे शहरवासीयांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.शहरातून जाणारा जुना हायवे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात एसटीची वाहतूक आहे. गेले काही दिवस मोळाचा ओढा ते गोडोली नाक्यापर्यंतच्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता शहरातून जात असल्याने पादचाऱ्यांना सुरक्षितपणे जाता यावे म्हणून रस्त्याच्या दुतर्फा पदपथ बांधले जात आहेत. त्यापैकी तहसीलदार कार्यालय कॉर्नर ते बसस्थानकापर्यंत आताच पदपथ झाला आहे. अजून अंगाची हळदही निघाली नाही म्हणतात त्याप्रमाणे अजून या नव्या पदपथावरून चालण्याचा लोकांनी आनंदही घेतला नाही, तोच बसस्थानकाशेजारी बीओटी तत्त्वावर बांधल्या जात असलेल्या महामंडळाच्या वास्तूसमोर पदपथाच्या बाहेर रेलिंग करून तो आपल्या मालकीचा असल्याप्रमाणे आत घेण्याचा पराक्रम चालला आहे. हे रेलिंगचे काम दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू होते. पण तरीही तेथून जेमतेम पाचशे मीटरवर असलेल्या बांधकाम विभागाने त्यात कसलाही हस्तक्षेप न केल्याने ही मिलीभगत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.यासंदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पदपथ हा पादचाऱ्यांसाठीच असून, त्या विकसकाचे हे कृत्य बेकायदा असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. हा विभाग याची किती गंभीरपणे दखल घेतो, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या पदपथावर अन्य व्यावसायिकांनीही तत्काळ कब्जा केला असून, त्यावर दुकाने थाटली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागणार आहे. परिणामी पादचाऱ्यांच्या नावाने लाखो रुपये खर्चून बांधलेला पदपथ नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी)