शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अकरा अतिरिक्त कर्मचारी आॅक्टोबरपासून बिनपगारी

By admin | Updated: February 23, 2015 00:22 IST

समायोजनची प्रतीक्षा : २०१२-१३ मधील अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे थकित वेतन

सातारा : सातारा जिल्ह्यातील २०१२-१३ च्या शिक्षक निश्चितीनुसार अनुदानित शाळेवरील सहा लिपिक व पाच शिपायांना अतिरिक्त ठरविण्यात आले होते. त्यामुळे त्यांना आॅक्टोबर २०१४ पासून पगार मिळालेला नाही. त्याना वेतन देऊन समायोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.संबंधित सहा लिपिक व शिपयांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांनी १५ मार्च २०१४ रोजी दिलेल्या आदेशानुसार सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात अतिरिक्त कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये रिक्त पदांअभावी संबंधित अकरा जणांचे अद्याप समायोजन झालेले नाही. अतिरिक्तपदी समायोजन न झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन सप्टेंबर २०१४ पर्यंत करण्यात यावे, असे आदेश १४ आॅक्टोबर २०१४ व १७ आॅक्टोबर २०१४ च्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आले आहेत. परंतु, महाराष्ट्र राज्य पुणे आयुक्त कार्यालयाकडे रिक्त पदांअभावी समायोजन न झाल्याने व अशाच समायोजन करणे व आॅक्टोबर २०१४ पासूनचे वेतन मिळण्याविषयी प्रस्ताव पाठविला आहे. पुण्याचे प्राथमिक शिक्षण आयुक्त व महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक यांच्याकडे २०१२-१३ मधील कर्मचारी अतिरिक्त ठरल्यानंतर केलेल्या कारवाईचा अहवाल दिला होता. वारंवार संपर्क साधूनही आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही केलेली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधून प्रस्ताव पाठविला आहे.  तरीही वेतन व समायोजनाविषयी कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही, असेही पत्रकात म्हटले आहे. निवेदनावर सहा शिक्षक व पाच शिपायांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)उपासमारीची वेळसातारा जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत असलेले सहा लिपिक व पाच शिपायांचे पाच महिन्यांपासून पगार झालेला नाही. त्यातील अनेकांचे लग्न झालेले आहे. त्यांच्यावरच कुटुंबीयांची जबाबदारी आहे. वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे वेळेवर पगार न झाल्यास आत्मदहन करण्याची वेळ आली आहे, असा इशारा देण्यात आला आहे.