शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वीज चोरीचा ‘भार’ गावावर !

By admin | Updated: May 5, 2017 22:55 IST

वीज चोरीचा ‘भार’ गावावर !

लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव हवेली : येथील वीजवितरण कंपनीचे कार्यालय या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. सध्या वडगाव हवेली या एकाच गावावर जादा वीज चोरीचा ठपका ठेवत अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यातून संपूर्ण गाव वेठीस धरण्यात आले असून, जखम मांडीला व मलम शेंडीला, असा प्रकार सुरू आहे. वीजवितरण कंपनीच्या टेंभू उपकेंद्राअंतर्गत कार्वे, वडगाव हवेली, कोरेगाव, टेंभू आदी गावांना वीजपुरवठा केला जात होता. गत दोन वर्षांपासून वडगाव हवेली येथे नवीन उपकेंद्र्राची निर्मिती झाल्यानंतर वडगाव हवेलीला या उपकेंद्रामधून वीजपुरवठा केला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिवसा अथवा रात्री अघोषित भारनियमन लागू करण्यात आले आहे. सध्या सर्वत्रच समान भारनियमन लागू असेल अशी लोकांची समजूत झाली. मात्र, परिसरातील कोणत्याच गावामध्ये अशा पद्धतीने भारनियमन केले जात नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी याबाबत ग्रामपंचायतीमार्फत वीजवितरण कार्यालयाला विचारणा केली असता इतर गावांच्या तुलनेत गावामध्ये वीज चोरीचे प्रमाण जास्त असून, जादा चोरी होत असल्याने इतर गावांपेक्षा जादा काळ भारनियमन करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून आल्याचे सांगण्यात आले. दि. १ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी भारनियमनाचा विषय मांडत इतर गावांमध्ये भारनियमन केले जात नसून येथेच का केले जाते?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. वीज चोरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे असताना नियमित बिल भरणाऱ्यांना हा भुर्दंड का?, असेही विचारण्यात आले. यावर वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव मांडण्यात आला. सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेती व पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट होत चालली आहे. शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना अहोरात्र प्रयत्न करूनही विजेमुळे पाणी देताना तारेवरची कसरत करावी लागते. कधी फ्यूज गेल्याने तर कधी इतर अडचणींमुळे वीज खंडित होते. शेतीला पाणी देण्यासाठी मजूर लावणाऱ्या शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावामुळे विनाकारण पैसे मोजावे लागत आहेत. अशातच वीज कंपनीने अघोषित जादा भारनियमन करून शेतऱ्यांना आणखीनच अडचणीत टाकले आहे.