शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विज वितरणने २४ तक्रारींचा केला ऑनलाइन निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST

सातारा : सातारा जिल्ह्यात आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एकूण २७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी २४ तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले ...

सातारा : सातारा जिल्ह्यात आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एकूण २७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी २४ तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले आहे. उर्वरित ३ तक्रारींमध्ये प्रशासकीय मंजुरीची गरज असल्याने त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती वीज वितरणाचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी दिली.

जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीज तारा तुटणे, झोल पडणे किंवा लोंबकळणे, फ्युज पेट्या व फीडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाइलच्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, ऊस गळीत हंगाम सुरू असल्याने सध्या ऊसतोडणीचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या वीज तारांचे घर्षण होऊन किंवा इतर विद्युत कारणांनी उसाला आगी लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी वीज यंत्रणा धोकादायक असल्यास त्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दिल्यास महावितरणकडून तातडीने दुरुस्ती कामे करण्यात येत आहेत.

महावितरणची वीज तार तुटलेली आहे. झोल किंवा लोंबळकत आहे. फ्युज पेट्या किंवा फीडर पिलरचे झाकणे उघडी किंवा तुटलेली आहेत. रोहित्रांचे कुंपण उघडे आहे. खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहेत आदी स्वरुपाची माहिती/तक्रार छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉट्सअ‍ॅपच्या मोबाइल क्रमांकावर नागरिकांना पाठवता येत आहे. यासोबतच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील सध्या सुरू असलेली ही सेवा उपलब्ध आहे.

चौकट :

सातारा जिल्ह्यासाठी ७८७५७६८५५४ हा व्हॉट्सअ‍ॅप मोबाइल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह तक्रार स्वीकारण्यात येत आहे. या क्रमांकावर नागरिकांना कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉट्सअ‍ॅपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्सअ‍ॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाइल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.

कोट :

नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधित तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीज सुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा व सहकार्य करावे.

- अंकुश नाळे, प्रादेशिक संचालक