शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतला पवार-बाबरवस्ती वर्ग

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

सकाळ सत्रातील शाळांना भेटी : विद्यार्थी खूश मात्र शिक्षकांनी घेतला धसका

कुडाळ : जिल्हा परिषदेने १५ मार्चपासून सकाळ सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही दिलासा दिला. तर या निर्णयाचे शिक्षणसंघटनांनी शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांचे आभार मानले. दरम्यान, मंगळवारी सकाळ सत्रातील शाळेच्या पहिल्याच दिवसांपासून शिक्षणाधिकारी गुरव यांनी शाळा भेटींना सुरुवात केल्यामुळे शिक्षकांनी चांगलाच धसका घेतला आहे. सातारा तालुक्यातील पवार-बाबरवस्ती शाळेस भेट देऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी चक्क पाठ घेतला.प्राथमिक शिक्षण विभागाने ज्ञानरचनावाद प्रभावीपणे राबवून राज्यपातळीपर्यंत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. त्यामुळे शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांच्यासह पदाधिकारी हे नेहमी शिक्षकांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतात. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता ओळखून जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळा सकाळ सत्रात घेण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार मंगळवारपासून सुरू झालेल्या सकाळच्या सत्रातील शाळांना भेटी देण्याच्या उद्देशाने शिक्षणाधिकारी गुरव यांनी थेट कण्हेर गाठले. यावेळी त्यांनी पवार-बाबरवस्ती शाळेत इयत्ता चौथीचा संतवाणी पाठ विद्यार्थ्यांना शिकविला. शाळेतील उपक्रमशील शिक्षिका ज्योती माळी, वैशाली गायकवाड यांनी आपण राबवित असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. (प्रतिनिधी)शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यापनाने विद्यार्थी भारावलेशिक्षणाधिकारी पुनिता गुरव यापूर्वी प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करीत होत्या. त्यामुळे त्यांनी अनेक वर्षांनंतर विद्यार्थ्यांशी असा सुसंवाद साधला. यावेळी त्यांना शिकविण्याचा मोहन आवरला नाही. चौथीच्या पाठ्यपुस्तकातील भाषेचा पाठ त्यांनी शिकविला. त्यांच्या अध्यापनाने विद्यार्थी भारावून गेले. तर त्यांच्या अचानक शाळा भेटींमुळे शिक्षकांची चांगलीच भंबेरी उडाली. यापुढे दररोज किमान पाच शाळांना भेटी देण्याचा त्यांनी कार्यक्रम ठरवला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उत्तम असून, शिक्षक प्रामाणिकपणे आपले ज्ञानदानाचे काम करीत आहेत. त्यामुळे शिक्षण अधिकारी म्हणून शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी प्रशासन उत्तम चालविण्याच्या दृष्टीने माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. -पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी