शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

शहरात वाढतेय ई-कचऱ्याची समस्या !

By admin | Updated: October 1, 2015 00:33 IST

वाढले प्रमाण : पालिकेकडून दुर्लक्ष; कचरा एकत्रिक रणासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही

कऱ्हाड : सध्या सर्वत्रच पर्यावरणाची अवहेलना झाल्याचे दिसते. त्यास कऱ्हाड शहरही अपवाद नाही. मात्र, याबाबीकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शहरात प्लास्टिक तसेच अन्नपदार्थांच्या कचऱ्याबरोबर आता ई -कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दिवसेंदिवस वाढणारा कचरा हा नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरत असून, या कचऱ्याला नाहीशी करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढला आहे. त्यामध्ये टीव्ही, फ्रीज, पंखे, वॉशिंग मशीन अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू अधिक आकर्षक पद्धतीने तयार करून बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जाऊ लागला. वस्तूंच्या दुरुस्तीसाठी जास्त पैसे लागणार असल्याने त्या दुरुस्तीअभावी घरातील तसेच इलेक्ट्रॉनिक दुकानातील एखाद्या खोलीत तशाच टाकल्या गेल्या जाऊ लागल्या. सध्या या वस्तूंचा साठा हा प्रमाणापेक्षा जास्त झाला आहे. शहरातील घरगुती व दुकानामधून एकत्रित केल्या जाणाऱ्या कचऱ्यामध्ये अशा जुन्या वस्तूंचे पार्ट हे जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. शहरातील इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये दुरुस्तीसाठी आलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने ते साहित्य दुकानदारांकडून तसेच दिवसेंदिवस साठवून ठेवले जाते. वापराविना पडून राहिलेल्या या साहित्याला कालांतरानंतर गंज चढतो. मग कधीकाळी या वस्तू विद्युत लहरींच्या संपर्कात आल्यास त्यातून शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचेही प्रकार घडतात आणि काहीवेळा असे प्रकार घडलेही आहेत. पावसाळ्यामध्ये शॉर्टसक्रिट होऊन आग लागण्याच्या घटना वारंवार घडलेल्या आहेत.शहरात मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉनिक साहित्याची दुरुस्ती तसेच विक्री करणारी दुकाने असल्याने त्यातून दररोज मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्यांची विक्री तसेच दुरुस्ती केली जाते. त्या दुकानातील जुन्या वापराविना पडून असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या भंगारातही घातल्या जातात. त्यामुळे शहरात भंगार व्यावसायिकांकडेही इलेक्ट्रॉनिक साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून येते.शहरात परिसरातून गोळा केलेले भंगाराचे साहित्य गोदाममध्ये साठविले जाते. त्यामध्ये विद्युतवाहक तारा, फ्रिज, टीव्ही, लाईटचे पार्ट तसेच विजेची उपकरणे अशा प्रकारचे जुने साहित्य भंगार व्यावसायिक एकत्रित करून या ठिकाणी आणतात.मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रानिक कचरा साठला की, पुणे-मुंबई या ठिकाणी पाठविले जाते. इलेक्ट्रॉनिक कचरा साठवताना त्यांची विशेष खबरदारी न घेतल्यास शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते.पालिकेच्या वतीने शहरातील प्लास्टिक कचऱ्याबरोबर अशा इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, बाराडबरी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठवून त्याची तात्पुरती विल्हेवाट लावण्याचे पालिकेकडून केले जात आहे. या ऐवजी ई- हार्वेस्टिंग प्रकल्प उभारल्यास शहरातून एकत्रित केला जाणारा कचरा व इलेक्ट्रॉनिक कचरा यांची योग्यप्रकारे विल्हेवाट करता येऊ शकेल, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकार सांगतात.(प्रतिनिधी) ई-कचरा हार्वेस्टिंग प्रकल्प उभारावापालिकेकडे स्वत:चा असा ई-कचरा हार्वेस्टिंग प्रकल्पही नाही. शहरातून एकत्रित केला जाणारा ४० टन कचरा हा शहराबाहेरील बाराडबरी या ठिकाणी टाकला जातो. या ठिकाणी एका बाजूला कचरा टाकला जातोय तर दुसऱ्या बाजूला चोवीस तास पाणी योजनेच्या टाकीचे बांधकाम केले जात आहे. या ठिकाणी ई-कचरा हार्वेिस्टंग प्रकल्प उभारावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.ई-कचरा म्हणजे...संगणक, टीव्ही, एलईडी, एलसीडी, टेलिफोन, प्रिंटर, रेडिओ, फॅक्स मशीन, व्हीसीआर, डीव्हीडी, सीडी प्लेअर, मायक्रोवेव्ह, मोबाईल, बॅटरी यापासून निर्माण झालेला कचरा हा ई-कचऱ्यात मोडतो.