शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दारोदारी कचरा गाडी; तरीही अस्वच्छता

By admin | Updated: February 20, 2015 23:14 IST

मलकापुरात साचले कचऱ्याचे ढीग : नागरिकांच्या आडमुठेपणापुढे नगरपंचायत हतबल, जागृतीसाठी आधी दंड आता होणार गांधीगिरी

मलकापूर : शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नगरपंचायतीकडून दारोदारी घंटागाडी व दोन ट्रॅक्टर फिरवले जातात. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी २४ कचराकुंड्याही ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही काही नागरिक रस्त्याकडेलाच कचऱ्याचे ढीग लावतात. त्यामुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त होत आहे.रस्त्याकडेला कचरा टाकू नये, म्हणून दररोज घंटागाडीवर ध्वनियंत्रणा बसवून आवाहन करण्यात येते. काहीना नोटिसाही धाडल्या आहेत. मात्र आजही अनेक नागरिक जाता-जाता कचरा रस्त्याकडेला फेकतातच. यावर उपाययोजना करण्यात स्थानिक प्रशासनाने हात टेकले. शेवटचा उपाय म्हणून दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत रस्त्याकडेला कचरा टाकणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फूल देऊन रस्त्याकडेला कचरा न टाकण्याची विनंती करायचा निर्णय नगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. दंडात्मक कारवाईला न जुमानणारे नागरिक या गांधीगिरीच्या उपायाला किती प्रतिसाद देणार, हा संशोधनाचा विषय आहे. स्वच्छ व निर्मल मलकापूरसाठी नागरिकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. यासाठी शाळांपासून सुरुवात करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)घंटागाडी जाताच कचरा रस्त्यावरशाळेतील म्हणीप्रमाणे घंटागाडी दारात आल्यानंतर कचरा टाकण्याऐवजी गाडी पुढे गेली की कचरा बाहेर येतो. तो कचरा काही अंतरावर ठेवलेल्या कचराकुंडीत टाकण्याऐवजी आळस करून रस्त्याकडेलाच टाकला जातो. त्याच पद्धतीने अनेक हॉटेल व्यावसायिक ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकण्याऐवजी रात्रीच्या वेळी रस्त्याकडेलाच नाल्यात कचऱ्याचे डबे रिकामे करतात. नगरपंचायतीच्या सुविधा नगरपंचायतीच्या वतीने २४ कंटेनर महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. सहा घंटागाड्या गल्लोगल्ली कचरा गोळा करतात. दोन ट्रॅक्टर व एक कंटेनरद्वारे हॉटेल व्यावसायिकांचा कचरा गोळा केला जातो. हक्क ‘बांधकाम’चा; काम नगरपंचायतीकडेमलकापूर शहरातून ‘एमएसआरडीसी’ चा राष्ट्रीय महामार्ग व बांधकाम विभागाचे तीन रस्ते मार्गस्थ झालेले आहेत. हे सर्व रस्ते त्या-त्या विभागाच्या अखत्यारित आहेत. रस्त्याकडेच्या जागेवर ते स्वत:चे हक्कही सांगतात. मात्र, या रस्त्याकडेची देखभाल दुरुस्ती मात्र नाईलाजाने नगरपंचायत प्रशासनाला करावी लागत आहे. मलकापुरात गोळा होणारा कचरा विचारात घेता, तेवढ्या मोठ्या प्रमाणात नगरपंचायतीकडे जागा उपलब्ध नाही. नागरिकांनी कचरा रस्त्याकडेला टाकू नये. त्याचबरोबर शहरातून बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाचे रस्ते जातात. त्या रस्त्याकडेची स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र फंड टाकावा लागतो. त्यासाठी अनेक अडचणी येतात. तरीही लवकरच घनकचरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत. - राजेंद्र तेली, मुख्याधिकारी, मलकापूर मलकापूर शहरात एेंंंशी टक्क्यांपेक्षा जास्त सुशिक्षित नागरिक वास्तव्य करतात. नगरपंचायतीने सोयी केल्या आहेत. तरीही काही नागरिक आडमुठे वागत असतील, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी. - मधुकर शेलार,शिवसेना, माजी शहर प्रमुखवैद्यकीय कचरा रस्त्याकडेला शहरात वैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी खासगी स्वतंत्र यंत्रणा फिरत आहे. याशिवाय कचऱ्यासाठी नगरपंचायतीने अनेक सुविधा केल्या आहेत. पन्नास फुटांवर कचराकुंडी असतानाही काही वैद्यकीय व्यावसायिक धोकादायक ठरणारा वैद्यकीय कचरा रस्त्याकडेलाच फेकतात. दररोज पंधरा टन कचरा मलकापूर शहरात प्रतिदिन सुमारे १५ टन कचरा गोळा होत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपंचायतीकडे जागाच उपलब्ध नाही. सर्व कचरा हा जुन्या स्मशानभूमीच्या पाठीमागे गोळा केला जातो. कचरा एकत्र असल्यामुळे जुन्या गावठाण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा एकत्र करण्यात आल्याने जुन्या गवाठाणात माश्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.