शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या वादामुळे करंडी शाळेला ग्रामस्थांनी टोकले टाळे

By admin | Updated: July 7, 2015 22:28 IST

बदल्यांची मागणी : अंतर्गत वादाचा विद्यार्थ्यांना फटका

मेंढा : करंडी, ता. जावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या अंतर्गत वादामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या आरोप करीत करंडी ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. ०७) शाळेला टाळे ठोकले. या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या कराव्यात व कायमस्वरूपी शिक्षक द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. करंडी, ता. जावळी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पाचवीपर्यंत प्राथमिक शाळा असून येथे चार शिक्षक व २४ विद्यार्थी आहेत. चार शिक्षकांपैकी दोन पुरूष व दोन महिला शिक्षक असून यापैकी दोन शिक्षणसेवक आहेत. या शिक्षकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत वाद असून या शिक्षकांची विद्यार्थ्यांसमोर अनेकदा भांडणे होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यातच मुख्याध्यापक पॅरेलिसिस पेशंट असून एक महिला शिक्षिका गेले काही महिने रजेवर होत्या.त्यामुळे दोन शिक्षक व पाच वर्ग व सततची भांडणे अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी म्हणने आहे.दरम्यान, याबाबत अनेकदा शिक्षण विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडे तक्रार करूनदेखील याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्याने सर्व विद्यार्थ्यांना बाहेर ठेऊन शाळा कमिटी अध्यक्ष नीता चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रकांत भोसले, सरपंच गेनू दुंदळे यांच्यासह ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तालुक्यात आणखी काही शाळांमध्ये शिक्षकांच्या कामाबद्दल नाराजी असून शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना अचानक भेटी द्याव्यात अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)शाळेला टाळे ठोकणे ही नियमबाह्य कृती आहे. ही बाब वरिष्ठांकडे कळविली असून याबाबत तातडीने तोडगा काढण्यात येणार आहे.- रमेश चव्हाण, गटशिक्षणाधिकारी