शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडले वसनेवरील बंधारे

By admin | Updated: December 25, 2014 00:02 IST

पंधरा वर्षांत केवळ दोन बंधारे : आश्वासनांचा पूर जातोय वाहून

पिंपोडे बुद्रुक : सोळशीच्या डोंगर पायथ्याला उगम पावलेली वसना नदी वर्षातील किमान आठ महिने वाहत असते. वर्षानुवर्षे डोळ्यांदेखत पाणी वाहून जात आहे. नदीवर कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची नितांत गरज असूनही गेल्या पंधरा वर्षांत केवळ दोनच बंधारे बांधले गेले आहेत. मात्र, बंधारे मंजूर केल्याच्या आश्वासनांचा अन् भूमिपूजनाचा पूरमात्र वसनेच्या पुरासोबत वाहून गेल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.दहिगाव, ता. कोरेगाव येथे पहिला बंधारा मंजूर करण्यात आला. तो पूर्ण करण्यासाठी पाच-सहा वर्षांचा कालावधी लागता. मात्र, आजही तो बंधारा पूर्ण क्षमतेने पाणी साठवू शकला नाही. जवळपास एक कोटी खर्चून बांधलेला बंधारा निकृष्ट पद्धतीच्या कामामुळे बहुतांश काळ कोरडाच असतो. त्यानंतर सोनके-पिंपोडे बुद्रुक गावच्या हद्दीत दुसरा बंधारा बांधण्यात आला. मात्र, दोन वर्षे झाली तरी त्याला दरवाजेच बसले नव्हते. शेवटी कंटाळून बाजूच्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने त्या बंधाऱ्याला दरवाजे बसवले. मात्र, पायातूनच गळती होत असल्यामुळे तो बंधाराही निरुपयोगी झाला आहे.घिगेवाडी, पिंपोडे बुद्रुक, वाघोली, सोनके या चार गावांच्या हद्दीत वसना नदीवर पाच बंधारे मंजूर करण्यात आले. मात्र, या कामांना निधी उपलब्ध होऊ शकला नाही. गत लोकसभा निवडणुकांपूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजने उरकण्यात आली; पण अजून तरी तेथील जागेवरून दगडही हलला नाही, हे विशेष.वसनेचे पाणी कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांद्वारे अडविल्यास परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीपाण्याचा खूप मोठा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे. याकडे राजकीय हेतूने पाहिले जात असून, केवळ श्रेयवादात अशी समाजोपयोगी कामे अडकून पडत आहेत. यावर मात्र कोणी मंथन करताना दिसून येत नाही. जलसंधारणाच्या कामांबाबत शासनाची कितीही सकारात्मक भूमिका असली तरी स्थानिक लोकप्रतिनिधी निधी मिळविण्यात अन् जनरेटा उभा करण्यात कमी पडत असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)वसना नदीवर पाच बंधारे मंजूर आहेत. साधारणपणे अडीच ते तीन कोटंचा निधीची आवश्यकता आहे. भूमिपूजने होऊनही केवळ निधीअभावी कामे सुरू होऊ शकली नाहीत. मात्र, आमदारांच्या प्रयत्नातून अधिवेशन संपल्यावर यावर सकारात्मक मार्ग काढून कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- सतीश धुमाळ, सदस्य, जिल्हा नियोजन मंडळ,