सूर्यकांत निंबाळकर - आदर्कीग्रामपंचायतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीच्या पलीकडे शेड बांधले आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. शंभर वर्षांपासून ओढ्याच्या अलीकडे अंत्यसंस्कार केले जातात, ती जागा खासगी मालकीची असल्यामुळे त्याठिकाणी अंत्यसंस्कार केल्यानंतर नातेवाइकांना शिव्याचा प्रसाद मिळतो.आदर्की खुर्द, ता. फलटण येथे मोठ्या ओढ्याच्या कडेला जिराटी नावाच्या शिवारात गेल्या शंभर वर्षांपासून अंत्यसंस्कार केले जातात. ग्रामपंचायतीने १५ वर्षांपूर्वी ओढ्याच्या पलीकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी शेड बांधले; परंतु ओढ्याला पूर आल्यास अंत्यसंस्कार अलीकडेच करावे लागतात. शेडमध्ये आतापर्यंत फक्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या नातेवाइकाचेच अंत्यसंस्कार झाले आहेत. जुन्या व नवीन स्मशानभूमीत विजेची सोय नसल्यामुळे एखाद्या व्यक्तीचे रात्रीच्या वेळी निधन त्यांच्यावर सकाळीच उजेडात अग्निसंस्कार करावे लागतात. अन्यथा रॉकेलचे टेंबे करुन स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी न्यावे लागते. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.स्मशानभूमीच्यामरणयातना...पावसाळ्यात मृतदेह वाहून जाण्याचे प्रकारपावसाळ्यात नदीपलीकडे अंत्यविधी केल्यास ओढ्याच्या पुरात मृतदेहाचे अर्धवट अवयव वाहून जाण्याचे प्रकारही घडले आहेत. त्याठिकाणी पाण्याची सोय नसल्यामुळे नातेवाइकांना गावातून पाणी न्यावे लागते. दुसऱ्या ओढ्याला पूल नसल्यामुळे खांदेकऱ्यांना व ग्रामस्थांना गाळातून व पाण्यातून मार्ग काढत जावे लागते.
खासगी जागेत अंत्यविधीमुळे मनस्ताप
By admin | Updated: August 18, 2014 23:40 IST