शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

वाईच्या पूर्व भागावर दुष्काळाचे ‘विघ्न’ कायम

By admin | Updated: September 11, 2014 00:13 IST

पावसाची प्रतीक्षा संपेना : पाण्याअभावी गणेशमूर्तींचे इतरत्र विसर्जन

कवठे : वाई तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पावसाने ओढ दिल्याने जलस्तोत्रांची स्थिती गंभीर झाली आहे. विहिरी व ओढे कोरडे पडल्याने पूर्व भागावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पाणी नसल्याने यंदा पूर्व भागातील गणेशमंडळांना देखील गणेशमूर्तींचे विसर्जन वाई व सोनेश्वर या ठिकाणी करावे लागले.पूर्व भागात शिवारातून वाहणारे ओढे हेच मुख्य जलस्तोत्र आहे. जास्तीत जास्त विहिरी या ओढ्यालगतच आहेत. यंदा या परिसरात कमी पाऊस झाल्याने ओढ्यांना पाणीच आले नाही. परिणामी कवठे, केंजळ, सुरूर, चांदक, गुळुंब, वेळे या परिसरातील विहिरींची पाणीपातळी खालावली आहे.या सर्व परिसराला तारक असलेल्या ओढ्यांना पूर आल्यास विहिरींची पाणीपातळी वाढते व वर्षभर शेतीस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध होतो; परंतु यंदा परिसरातील ओढ्यांना एकही पूर आला नसल्याने सर्वच ओढ्यांचे पात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. निसर्ग कोपल्याने यंदा गणेश विसर्जन करायचे कोठे? हा प्रश्न परिसरातील गणेशभक्तांना सतावत होता. यावर उपाय म्हणून घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशमूर्तींचे विसर्जन वाई व सोनेश्वर, ओझर्डे येथे कृष्णा नदीत करावे लागले.हत्ती नक्षत्रात पाऊस पडला नाही तर वाई तालुक्याच्या पूर्व भागास भीषण दुष्काळास सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे आता ‘हत्ती’ नक्षत्र तारणार की मारणार? अशी परिस्थिती तालुक्याच्या पूर्व भागात निर्माण झाली आहे. (वार्ताहर)