शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात दुष्काळ; पण महिला सदस्या दौऱ्यावर!

By admin | Updated: May 24, 2016 00:57 IST

जनतेच्या प्रश्नावर चर्चा करणार कोण? : जलयुक्त कामांची मंजुरी जानेवारीत घेण्याचा ठराव; वीजवितरण, आरोग्य, कृषी विभागांवर ताशेरे--कऱ्हाड पंचायत समिती सभा

कऱ्हाड : तालुक्यात सध्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये तालुक्यातील टंचाईच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी तसेच त्यावर उपाययोजना आखण्याऐवजी उत्तर भारतात अभ्यास दौरा करण्यासाठी पंचायत समितीमधील महिला सदस्या रवाना झाल्या. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना अभ्यास दौरा करण्यासाठी सदस्या गेल्याचा हा प्रकार सोमवारी पार पडलेल्या पंचायत समितीच्या सभेदरम्यान उघडकीस आला. अशा प्रकारे दुष्काळी परिस्थितीत आयोजित केलेल्या दौऱ्यातून महिला सदस्या नक्की कोणता अभ्यास करणार अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये केली जात होती. कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते. तर गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते.दुष्काळी परिस्थितीत पार पडलेल्या या मासिक सभेत जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावाचा कालावधी वाढविण्याचा ठराव सर्वानुमते मांडण्यात आला. तर प्रशासनातील कामांबाबत उदासीनता, वेळेबाबत पाळल्या न जाणाऱ्या सूचना आदींवरून वीज वितरण विभागावर ताशेरे ओढण्यात आले. उंब्रज येथे बिनटाका शस्त्रक्रिया शिबिराप्रसंगी रुग्णांना आलेल्या अनेक समस्या, त्यांच्याकडून आलेल्या तक्रारीवरून आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर सदस्यांनी आगपाखड केली. तर योजनांबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्या कारणावरून कृषी विभागातील अधिकाऱ्यांना सभापती पाटील यांनी धारेवर धरले.येथील पंचायत समितीच्या सभेच्या सुरुवातीस तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर जी चर्चा होणे गरजेचे होते. ती होण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून सभेस उशिरा येणे, कामांबाबत दिरंगाई करणे, वर्षानुवर्षे काम न करणे आदी विषयी चर्चा करण्यात आली. सभेदरम्यान तालुका कृषी अधिकारी खरात यांनी कृषी विभागाचा आढावा सादर केला. ‘मागेल त्याला शेततळी देणे’ या योजनेअंतर्गत तालुक्यातील चाळीस प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहे. तालुक्यातील १३ गावांचा ३० कोटींचा आराखडा हा शासनाकडे पाठविला असून, त्यातील ८ कोटींच्या कामांचा आराखडा हा शासनाकडून प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी खरात यांनी दिली. यावर अधिकाऱ्यांनी तालुक्यातील कामांबाबत नियोजन करण्यापेक्षा कामे करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अगोदर कामे करा, अशा सूचना सभापती देवराज पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. १७ जून पर्यंत शासनाची कामे पूर्ण करणे महत्त्वाचे असताना अजूनही विभागांकडून कामे कशा प्रकारे करायची याचे नियोजन केले जात असल्याची माहिती सभापती देवराज पाटील यांनी सभागृहास दिली.यावेळी सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांनी जलयुक्त शिवार कामांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव हे सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये पाठविण्यात येतात. त्यामुळे उशिरा मंजुरी मिळते. असे करण्याऐवजी तत्काळ कामांना मंजुरी मिळण्यासाठी जानेवारीत कामांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. तसा ठराव मंजूर करावा, अशी मागणी केली. त्यावर सभापती देवराज पाटील यांनी ठरावाला मंजुरी दिली. यानंतर वीज वितरण विभागातील अधिकाऱ्यांनी आढावा सादर केला असता सदस्या अनिता निकम यांनी वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांकडून वेळेवर कामे केली जात नाहीत. यातील अधिकाऱ्यांनी आपली कामातील जबाबदारी आळेखून काम केले पाहिजे. मासिक मीटिंगला उशिरा उपस्थित न राहता वेळेवर राहायला शिकले पाहिजे, अशा शब्दात अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. तालुक्यातील म्हारूगडेवाडी येथे नियमितपणे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना सभापती देवराज पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी एम. डी. आरळेकर यांना दिल्या. (प्रतिनिधी) अभ्यास दौऱ्याच्या शुभेच्छाकऱ्हाड तालुक्यात एकीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना तालुक्यातील प्रश्नांवर, समस्यांवर चर्चा करण्याऐवजी महिला सदस्या या सभा मध्यावरच सोडून निघून गेल्या. सभेदरम्यान महिला सदस्यांना कधी अभ्यास दौऱ्यांना जातो याची घाई लागून राहिली होती. अखेर एक तास चर्चा केल्यानंतर दुपारी दोन वाजता महिला सदस्यांनी सभागृह सोडले. यावेळी अनेकांनी सभा सुरू असतानाच त्यांना शुभेच्छा दिल्या.