शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही ‘डॉल्बी’ होणार शिरवळमधून हद्दपार !

By admin | Updated: August 24, 2016 23:41 IST

शांतता कमिटीची बैठक : गणेशोत्सवात घुमणार पारंपरिक वाद्यांचा आवाज

शिरवळ : ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘आव्वाज गावाचा नाय डॉल्बीचा’ या चळवळीला शिरवळ व परिसरात यश आले असून, शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉल्बीमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.‘शिरवळमधील गणेशोत्सवाची परंपरा ही वाखाणण्याजोगी असून, शिरवळमधील गणेश मंडळांनी परंपरा जोपासत पारंपरिक वाद्यांचा वापर करत शिरवळचा नावलौकिक वाढविण्यासाठी आगामी गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बीला फाटा देत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू करावी. डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत थारा देण्यात येणार नसून प्रसंगी कठोर कायदा अवलंबत डॉल्बीही जप्त करण्यात येईल,’ असा इशारा शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे यांनी दिला आहे. शिरवळ (ता. खंडाळा) येथील जय तुळजा भवानी मंगल कार्यालयात शिरवळ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शांतता कमिटी व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी शिरवळ उपसरपंच उदय कबुले, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप माने, विजय पवार, माजी उपसरपंच भापकर, तंटामुक्त अध्यक्ष संदीप गायकवाड, आरपीआय तालुकाध्यक्ष दादासाहेब कांबळे, राजेश शेटे, हृषीकेश मोहिते, बाळासाहेब जाधव, हेमंत तारू, अरविंद ननावरे, ताहेर काझी, सोमनाथ बरदाडे, बंटी बरदाडे, आकाश कबुले, सहायक पोलिस निरीक्षक स्मिता पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार, परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक छाया बोरकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश जाधव आदी उपस्थित होते . यावेळी प्रदीप माने म्हणाले, ‘शिरवळमधील गणेश मंडळ हे नियमाचे पालन करणारे असून, कायद्याच्या कचोटीत राहून पोलिसांच्या सर्व अटी पाळून गणेश मंडळांना कमी आवाजाची मर्यादा घालत डॉल्बीला परवानगी द्यावी.’ राजेंद्र तांबे म्हणाले, ‘शिरवळचा नावलौकिक जिल्ह्यात वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून, गुलालमुक्त व ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सव राबविण्यासाठी पोलिसांनी गणेश मंडळांना साऊंड सिस्टीम वापरण्यासाठी कायदेशीर परवानगी द्यावी.’उदय कबुले म्हणाले, ‘स्वच्छ व सुंदर निरामाता उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकीतून शिरवळ ग्रामपंचायत निर्माल्य कुंडासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे.’ आदेश भापकर म्हणाले, ‘गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी सामाजिक बांधिलकीतून निरामय स्वच्छता अभियान राबिवण्यात येणार असून, गणेश विसर्जनादिवशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नीरा नदीजवळ निर्माल्य कुंड व गणेशमूर्ती विसर्जनासाठी तळे उभारावे.’ यावेळी संदीप गायकवाड, राजेश शेटे, संपत मगर, सुनील पवार यांनी मनोगत व्यक्त केले . पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)इतर मंडळांनीही अनुकरण करावे : संपत मगर शिरवळमधील सर्वात मोठे असणारे गणेश मंडळ म्हणून केदारेश्वर तरुण मंडळ ओळखले जाते. यावेळी बैठकीमध्ये शिरवळ पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केदारेश्वर तरुण मंडळ हे गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बीमुक्त गणेश मंडळ ही संकल्पना राबवत केदारेश्वर गणेश मंडळ डॉल्बीचा वापर करणार नसल्याचे जाहीर केले . यावेळी पोलिसांनी केदारेश्वर तरुण मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत इतर मंडळांनीही याचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.प्रदीप माने व म्हेत्रे यांच्यात चकमक शिरवळ येथील गणेश मंडळांच्या बैठकीत प्रदीप माने यांनी डॉल्बीला परवानगी देण्याची मागणी करताच पोलिस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे यांनी कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचे सांगताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहण्यास मिळाली.