शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांना सूचकही मिळू देऊ नका !

By admin | Updated: March 31, 2015 00:24 IST

जिल्हा बँक निवडणूक : ल्हासुर्णेतील बैठकीत शशिकांत शिंदे कडाडले

कुडाळ : विधानसभा कोरेगाव मतदारसंघातून लढविली तरी जावळीच्या जनतेशी अजून नाळ तोडली नसल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक आमदार शशिकांत शिंदे जावळीतून सोसायटी मतदार संघातून लढविणार. भाजपच्या दीपक पवारांनी दंड थोपटल्याने शशिकांत शिंदे सावध झाले असून, रविवारी त्यांनी जावळीतील सोसायटी ठराव झालेल्या मतदारांची ल्हासुर्णे निवासस्थानात बैठक घेतली.सोसायटी मतदारसंघातून जावळीतून आतापर्यंत दिवंगत लालसिंगराव शिंदे, राजेंद्र शिंदे यांच्यानंतर सुनेत्रा शिंदेंनी परंपरा जपली होती. मात्र, गत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार शिंदे यांनी राजकीय कौशल्याने सुनेत्रा शिंदे यांना या गटातून बाजूला सारत स्वत: बिनविरोध बँकेत जाऊन गटावर कब्जा मिळविला. यावेळीही त्यांनी ठराव प्रक्रियेत अधिक लक्ष घालून आपल्या विचारांचे ठराव करून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केलीे.तालुक्यात एकूण ४९ सोसायट्या आहेत. ठराव झालेल्या मतदारांच्या गाठीभेटी घेत भाजपच्या दीपक पवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांनी रविवारी सायंकाळी मतदारांची बैठक घेतली. या बैठकीस जवळपास ३० ते ३५ मतदार उपस्थित होते, तर उपस्थितांमधून सर्वांनी आमदार शिंदे यांनाच जिल्हा बँकेत बिनविरोध पाठविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देत त्यांना सूचक-अनुमोदकही मिळणार नसल्याचे सांगिंतले. यावेळी सुहास गिरी, सुदामराव शिंदे, चंद्रकांत तरडे, मोहन कासुर्डे, बबनराव चव्हाण, तानाजी शिर्के, लालासाहेब चव्हाण, राजेंद्र शिंदे, रामदास पार्टे, जयवंत दुदुस्कर, संजय निकम, उपस्थित होते. (वार्ताहर)शशिकांत शिंदे बिनविरोधचा निर्णयमतदारांच्या ल्हासुर्णेत झालेल्या या बैठकीत सोसायटी ठराव झालेल्या मतदारांनी आमदार शशिकांत शिंदे यांनाच जिल्हा मध्यवर्ती बँकेत बिनविरोध पाठवण्याचा निर्णय घेतला तर विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरीदेखील त्यांना उमेदवारी अर्ज भरताना सूचक-अनुमोदक देखील मिळणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही सभापती सुहास गिरी तसेच सुदामराव शिंदे यांनी बैठकीत दिली.