शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीमुळे पालिका तिजोरीत ७९ लाखांची दिवाळी !

By admin | Updated: November 2, 2016 23:47 IST

प्रशासनाची शक्कल आली कामी : ना हरकत प्रमाणपत्रासाठी अगोदर थकबाकी वसुली; अनुमोदकांनाही डबल लॉटरी

 सातारा : इच्छुक उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्र देताना मागील थकबाकी भरून घेतल्याने पालिकेच्या तिजोरीत यंदा तब्बल ७९ लाख थकबाकी जमा झाली आहे. पालिका प्रशासनाने लढविलेली शक्कल कामी आल्याने ही निवडणूक वसुली विभागासाठी सार्थक ठरली आहे. अपक्ष उमेदवारांचा अर्ज भरताना पाच अनुमोदक देणाऱ्या व्यक्तींनी पालिकेची थकबाकी भरलेली असावी, असा नियम पालिका प्रशासनाने काढला होता. यावेळी बहुतांश इच्छुक उमेदवारांकडून विरोधही झाला; परंतु अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या भीतीने अनेकांनी याकडे कानाडोळा करून थकबाकी जमा केली. अनेकवेळा दारोदारी वसुलीसाठी फिरूनही अनेकजण पालिकेला ठेंगा दाखवित होते. हा पूर्वानुभव वसुली अधिकाऱ्यांना माहिती असल्याने पालिका निवडणुकीच्या निमित्ताने वसुलीची संधी चालून आली होती. अपक्ष उमेदवाराला अनुमोदक व्यक्तीने घरपट्टी भरलेली सक्तीची असावी, असा नियम आहे की नाही, यावर चर्चा न करता पालिका प्रशासनाने वसुलीची मोहीम हाती घेतली. अनेकांनी घरपट्टी भरलेली नव्हती, अशा मिळकतदारांची घरपट्टी नाईलाजास्तव इच्छुक उमेदवारांना भरावी लागली. त्यामुळे अनुमोदक झालेल्या व्यक्तींनीही आता डबल लॉटरी लागल्याने अगदी तेही आनंदात अपक्ष उमेदवाराला साथ दिल्याचे पाहायला मिळाले. इतक्या कमी वेळात ७९ लाखांची विक्रमी थकबाकी जमा झाल्याने वसुली विभागाचीही दिवाळी झाली आहे. या वर्षाचे टार्गेट पूर्ण होत आले असून, आता आणखी काही थकबाकीदारांची नावे आहेत. निवडणूक पार पडल्यानंतर थकबाकीची मोहीम हाती घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी) ९५३ जणांना ना हरकत दाखला आॅनलाईन अर्ज भरताना पालिकेचा ना हरकत दाखला आवश्यक होता. त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवाराला हा दाखला घेण्यासाठी थकबाकी भरणे सक्तीचे केले होते. महिनाभरात ९५३ जणांना पालिकेने ना हरकत दाखला दिला. त्यामुळे यातून मोठ्या प्रमाणात वसुली जमा झाली.