शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोणंद नगरपंचायतीच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष...

By admin | Updated: December 8, 2015 00:33 IST

उच्च न्यायालयात आज फैसला : बबनराव शेळके यांची याचिका; काँग्रेस अन् राष्ट्रवादीतील वादाची झालर

 लोणंद : गेले अनेक दिवस जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या लोणंद नगरपंचायतीचे रुपांतर होणार की ग्रामपंचायतच राहणार याचा फैसला दि. ८ डिसेंबर रोजी होणार असून, या निर्णयाकडे लोणंदकरांचे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्य बबनराव राजाराम शेळके यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर दि. ८ डिसेंबर रोजी निकाल होणार आहे. लोणंद शहराचा विकास व्हावा म्हणून लोणंद ग्रामपंचायतीमध्ये दि. २ आॅक्टोबर २०११ रोजी नगरपंचायतीचा ठराव पास करून अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांनी प्रयत्न केले. त्यामुळे दि. ३० सप्टेंबर रोजी नगरपंचायत अस्तित्वात येणे गरजेचे होते. त्यामुळे लोणंद गावचा विकासाच्या दृष्टीने फार मोठा फायदा झाला असता. परंतु राष्ट्रवादीचे माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी राजकीय श्रेयवादामुळे नगरविकासाची फाईलही अडवली होती. तरीसुद्धा अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन व पत्रव्यवहार करून माजी सरपंच देवकी डोईफोडे व उपसरपंच राहुल घाडगे यांच्या कालावधीत ग्रामपंचायतीची नगरपंचायत व्हावी म्हणून नगर विकास खात्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केलीहोती.तसेच सभेत २०११ साली बागवान यांनी नगरपंचायतीचा ठराव मांडला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायतीला विरोध केला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये २०१२ साली लोणंद ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता आली. यानंतर नगरपंचायत न होण्याचा ठराव बबनराव शेळके यांनी केला. व त्याला अनुमोदन शिवाजीराव शेळके यांनी दिले. त्यानंतर पुन्हा एकदा १५ आॅगस्ट २०१५ रोजी उपसरपंच गणीभाई कच्छी यांनी नगरपंचायत न होण्याचा ठराव केला. त्यामुळे ४ ते ५ वर्षे लोणंद नगरपंचायतीची फाईल अडकून राहिली. राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती व भाजप नेते विनोद क्षीरसागर, लक्ष्मण शेळके, नारायण साळुंखे, सुभाषराव क्षीरसागर यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत प्रयत्न करून ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करून घेतले. त्यामुळे नगर विकास सचिवालय यांच्यामार्फत दि. २६ आॅक्टोबर २०१५ रोजी आदी सूचना जारी करून ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यात आले व नगरपंचायतीला प्रशासक म्हणून कारभार पाहण्यासाठी खंडाळा तहसीलदार शिवाजीराव तळपे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व बाबींवर हरकत घेऊन बबनराव राजाराम शेळके यांनी उच्च न्यायालयात दि. २६ आॅक्टोबर रोजी याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्या याचिकेवर एस. बी. सुखरे यांनी दि. ८ डिसेंबर २०१५ रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, त्यासाठी याचिकादाराच्या विरुद्ध तहसीलदार शिवाजीराव तळपे व ग्रामविकास अधिकारी लोणंद यांना सुनावणीसाठी बोलवले आहे.त्यांचे म्हणणे ऐकून पुढील निकाल देण्यातच येणार आहे. त्यामुळे लोणंद गावची ग्रामपंचायत नगरपंचायत झाली आणि त्या निर्णयाला याचिका दाखल करून विरोध केला गेला व सर्व राजकीय पक्षाकडून आरोप/प्रत्यारोप करण्यात आले व त्याचा निर्णय/फैसला दि. ८ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयात मुंबई येथे होणार आहे. (वार्ताहर)लोणंद ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना सोयी-सुविधा पुरविता येणार नव्हत्या. औद्योगिक वसाहत वाढल्यामुळे नगरपंचायत होणे गरजेचे आहे. एखादे चांगले काम होत असले तर कोणीही या कामी आडकाठी आणू नये.- बाळासाहेब बागवान, काँग्रेस, जिल्हा उपाध्यक्ष