शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; नवजाला १४० मिलिमीटरची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST

सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम भागातील नवजा येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, ...

सातारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम भागातील नवजा येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर पूर्व दुष्काळी भागात अनेक ठिकाणी पाऊस दमदार कोसळला. पश्चिम भागातील पावसामुळे धरणांत पाण्याची आवक वाढत आहे. कोयनेत ९५.१५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात पाच दिवसांपासून पाऊस होत आहे. मात्र, मागील एक महिना पाऊस अत्यल्प पडला. जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी पश्चिम भागात तर धुवाँधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्ते वाहून गेले होते. तसेच जमिनी खचल्या होत्या. हा पाऊस लोकांवर काळ बनून आला होता, तर अवघ्या तीन दिवसांत कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस झाला होता. त्याचबरोबर कोयना धरणात इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. २४ तासांत १६ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता. तसेच इतर धरणांतही पाणी वेगाने वाढले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकदम कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणे पूर्णपणे भरली नाहीत, तर पूर्वेकडील खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळू लागली होती. त्यामुळे धरणे भरणार का ? अशी चिंता लागली होती. तसेच खरीप हंगाम वाया तर जाणार नाही ना ? अशी भीतीही व्यक्त होत होती. पण, गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे.

जिल्ह्यातील पश्चिम तसेच पूर्व भागातही दमदार पाऊस होत आहे. एक महिन्यानंतर प्रथमच चांगला पाऊस होत असल्याने पिकांना फायदा होणार आहे. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला. माण तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी येऊ लागले आहे. तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा होत आहे. तरीही अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

चौकट :

कोयनेला ६७ मिलिमीटर पाऊस...

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ६७ मिलिमीटर पाऊस पडला, तर जूनपासून आतापर्यंत ३,७१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच नवजा येथे १४० आणि आतापर्यंत ४,९९४ व महाबळेश्वरला ११, तर यावर्षी आतापर्यंत ४,९७९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास ९५.१५ टीएमसी पाणीसाठा झाला होता, तर २४ तासांत ७,४७४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे.

............................................................