शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

गणेश विसर्जनाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा

By admin | Updated: September 1, 2015 21:51 IST

उच्च न्यायालय : तळ्यांच्या बाबतीत कायद्यांचे पालन करा

सातारा : ‘मंगळवार व मोती तळे हे ऐतिहासिक, सांस्कृतिक व कलात्मक वारसास्थळाच्या (हेरिटेज) यादीत आहे. त्यामुळे त्यांचे वैभव कायम ठेवत ते जतन करण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. ‘हेरिटेज’च्या नियमाला अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा व त्याप्रमाणे काटेकोर कार्यवाही करावी,’ असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीत दिले.सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव व आॅक्टोबरमध्ये दुर्गा उत्सव साजरा होणार आहे. नगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी भवानी पेठेतील मोती तळे व मंगळवार पेठेतील मंगळवार तळ्यातील गाळ काढून स्वच्छता केली आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २५ ते ३० लाख रुपये खर्च आला आहे. आगामी दोन्ही उत्सवकाळात मंगळवार तळे, मोती तळे व फुटका तलाव या तिन्ही ठिकाणी पुन्हा मूर्तींचे विसर्जन होऊ शकते. त्यामुळे न्यायालयाने तातडीने या ठिकाणी मूर्ती विसर्जनास मनाई करावी, अशी विनंती येथील सामाजिक कार्यकर्ते व दिशा विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष सुशांत मोरे यांनी याचिकेद्वारे केली होती. भर लोकवस्तीत असलेल्या मंगळवार व मोती तळ्यात मोठ्या प्रमाणात मूर्तींचे विसर्जन होत असल्याने परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागतो. मूर्ती विसर्जनामुळे तलावाचे पाण्याचे मूळ स्रोत मुजले. तलावातील जीवसृष्टी धोक्यात आली. दूषित पाण्यामुळे परिसरातील विहिरी-आड, बोअरवेलचे जलस्रोत दूषित झाले होते. त्यामुळे लाखो रुपये खर्चून पालिकेने दोन्ही तळ्यांतील गाळ काढला. हा खर्च पर्यायाने नागरिकांकडून कर रूपाने वसूल झालेल्या पैशातून झाला. आता पुन्हा त्याच तळ्यांमध्ये मूर्तींचे विसर्जन होणार असेल तर नागरिकांचा पैसा पाण्यात जाणार आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. या याचिकेची सुनावणी मंगळवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील व सुखरे यांच्यापुढे झाली. या सुनावणीत न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना विसर्जनासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. सुशांत मोरे यांच्यावतीने उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील अभय थोरात व अ‍ॅड. अपर्णा गाडे यांनी काम पाहिले. पालिकेच्यावतीने अ‍ॅड. शैलेश चव्हाण, तर सरकारतर्फे अ‍ॅड. काकडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)