शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक मतदार यादी; निकालाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:44 IST

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये युद्धापूर्वीची शांतता पाहायला मिळते आहे. विद्यमान संचालक आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे मित्र ...

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये युद्धापूर्वीची शांतता पाहायला मिळते आहे. विद्यमान संचालक आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे मित्र माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. विविध संस्थांमधून या दोघांचे ठराव झाले असल्याने या दोघांनाही तांत्रिक लढाई लढावी लागणार असून, निवडणूक विभागाकडून दिल्या जाणाऱ्या हरकतींवरील निकालाकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेने प्रसिद्ध केलेल्या १९६३ जणांच्या कच्च्या मतदार यादीवर ४६ आक्षेप दाखल झाले असून, या हरकतींवर विभागीय सहनिबंधक कार्यालय कोल्हापूर येथे सुनावणी सुरू आहे. गृहनिर्माण संस्थेतून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी केलेले ठराव ते दोघे संस्था सभासद नसल्याचे कारण देत सातारा जिल्हा बँकेने रद्द केले होते.

जिल्हा बँकेने सभासद नसल्याचे कारण देत दोघांचेही ठराव रद्द केले आहेत. यासंदर्भात कोल्हापूर येथे विभागीय सहनिबंधकांसमोर बुधवारी दीड तास सुनावणी झाली. भाजपच्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी विभागीय सहनिबंधकांकडे दाखल केलेल्या आक्षेपावर दीड तास सुनावणी झाली. यावेळी वकिलांच्या माध्यमातून युक्तिवाद करण्यात आला. आता बुधवारी (दि. २२) सहनिबंधक सुनावणीवरील निकाल देणार आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी विद्यमान संचालक आमदार जयकुमार गोरे आणि भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर या दोघांना अपात्र ठरविण्यात आले. कोत्या बुद्धितूनच अपात्रतेचा निर्णय झाल्याची टीका आ. गोरे यांनी केली होती. तसेच यादीतील नाव वगळले गेले तर उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

तसेच बँक म्हणजे निवडणूक आयोग नाही. निवडणूक प्राधिकरणाने पाहणीसाठी मतदार यादी बँकेला दिली होती. बँकेने राजकारण करून यादीतील नावे अपात्र केली आहेत. बँकेने अधिकार नसताना घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर आहे. मी सोसायटी सभासद आहे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार बँकेला कोणी दिला. सहनिबंधकांकडे सुनावणीवेळी म्हणणे सादर केले आहे. २२ सप्टेंबरला निकाल दिला जाईल. तसेच २७ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर न्यायालयात जाण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले.

आणखी तक्रारींची शक्यता...

जिल्हा बँकेसाठी तयार केलेल्या कच्च्या मतदार यादीवर ४६ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. या हरकतींचा निकाल दि. २२ सप्टेंबर रोजी दिला जाणार आहे. आमदार गोरे व खासदार नाईक निंबाळकर यांच्याव्यतिरिक्त आणखी कोणी लढण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.