शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात कालबाह्य बियाणांचे वाटप

By admin | Updated: June 25, 2015 01:11 IST

शेतकऱ्यांची फसवणूक : कृषी विभागाचा प्रताप, मोफतच्या तणनाशकांची बेकायदा विक्री; कारवाईची मागणी

दत्ता पाटील / तासगाव तासगाव तालुक्यात राज्य शासनाच्या कृषी विभागाकडूनच शेतकऱ्यांना कालबाह्य झालेल्या मका बियाणांचे अनुदानावर वाटप होत आहे. मागीलवर्षी आलेल्या बियाणांची विक्री न झाल्यामुळे गोदामामध्ये पडून असलेल्या, मुदत संपलेल्या बियाणांची विक्री होत आहे. एवढेच नाही, तर गेल्यावर्षी मोफत वाटलेल्या तणनाशकाचे यावर्षी शंभर रुपये घेऊन शेतकऱ्यांना लुबाडण्याचा धंदाही खुलेआमपणे कृषी विभागात सुरू आहे. ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करून कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होत आहे. मान्सून पावसाचे आगमन झाल्यामुळे तासगाव तालुक्यात पेरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू झाली आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून गेल्यावर्षी अनुदानावर मका बियाणांचे वाटप करण्यात आले होते. महाबीज कंपनीच्या ‘कुबेर’ नावाच्या चार किलोच्या बियाणांच्या बॅगेची २२० रुपयांप्रमाणे गेल्यावर्षी शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली होती. या बॅगेची किंमत आठशे रुपये आहे. या बियाणांच्या बॅगेसोबत ‘अट्रानेक्स’ या नावाचे अर्धा किलोचे तणनाशक मोफत देण्यात आले होते. मागील खरीप हंगामाप्रमाणेच या हंगामात अनुदानावर बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधला. कृषी विभागाच्या यंत्रणेनेदेखील शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप सुरू केले आहे. मात्र हे बियाणे गेल्यावर्षीचेच आहे. हे बियाणे १८ एप्रिल २०१५ रोजीच कालबाह्य झाले आहे. तसेच गेल्यावर्षी मोफत वाटप करण्यात आलेले आणि शिल्लक राहिलेले तणनाशक यावर्षी शंभर रुपये घेऊन शेतकऱ्यांना बेकायदेशीरपणे विकले जात आहे. अशापध्दतीने मुदत संपलेल्या मका बियाणांचा आणि मोफत असूनदेखील तणनाशकाची पैसे घेऊन विक्री करण्याचा प्रकार कृषी विभागात राजरोसपणे सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांची बियाणांबाबतीत जनजागृती करण्याचे काम कृषी विभागाचे आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठीही कृषी विभागाने जनजागृती करण्याची आवश्यकता असताना, या विभागाकडूनच शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे चित्र तासगावात पहायला मिळत आहे.