शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

स्ट्रॉबेरी, भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव : वाई तालुक्यात करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:32 IST

वाई तालुक्यातील बदलत्या हवामानामुळे स्ट्रॉबेरीसह भाजीपाला यावर पडणाऱ्या करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण झाला आहे

ठळक मुद्देउत्पन्नावर परिणाम

पसरणी : वाई तालुक्यातील बदलत्या हवामानामुळे स्ट्रॉबेरीसह भाजीपाला यावर पडणाऱ्या करपा, तांबेरा, पांढरी भुरीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. स्ट्रॉबेरीसह भाजीपाला वाचविण्याचे आव्हानच रोगांनी दिल्याने शेतकºयांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

वाईच्या पश्चिम भागात गोळेवाडी, गोळेगावसह कोंडवली या गावांमधून स्ट्रॉबेरीसह भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्याने रोगराईचा बिमोड हवा तसा झालेला नाही, त्यातच वारंवार बदल होत असल्याने हवामानामुळे सध्या या भागातील स्ट्रॉबेरीसह कारले, तोडका, कोबी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो या पिकांवर तांबेरा, पांढरी भुरी, करपा, दावण्या, स्पॉट या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकाच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झालेला आहे.

पश्चिम भागात स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी पोषक वातावरण असल्याने महाबळेश्वर, पाचगणी भागातील शेतकºयांनी भाडेतत्त्वावर शेती घेऊन स्ट्रॉबेरी पिकाचा मदरप्लांट राबविला आहे; परंतु यावर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने विविध प्रकारच्या रोगांनी डोके वर काढले आहे.

स्ट्रॉबेरीसाठी लाखो रुपये खर्च करावा लागतो. इतर भाज्यांच्या मानाने या पिकांवर खर्च करावा लागत असला तरीही या पिकाला देशाबाहेर मागणी असल्याने त्यामधून उत्पन्न चांगले येत असल्याने शेतकरी या पिकावर चांगली मेहनत घेतात. त्यामुळे अशा रोगांची लागण झाल्यास उत्पन्नावर विपरित परिणाम होऊन आर्थिक गणित पूर्णपणे ढासळते. मालाची प्रतवारी कमी झाल्यास बाहेरगावी पाठविताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. परिणामी शेतकºयांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाकडून जास्तीत-जास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा व तसा कृषी विभागाने पाठपुरावा करून शासन दरबारी सादर करावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. शेतकºयांना दरवर्षी विकास सेवा सोसायटी, बँकांकडून कर्ज घेऊन शेतांची डागडुजी करावी लागते. यावर्षी स्ट्रॉबेरीसह सर्वच भाज्यांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने भाजीपाला करण्यासाठी झालेला खर्च जरी निघाला तरी समाधान मानावे लागणार आहे.कृषी विभागाने मार्गदर्शन करावे...कृषी विभागाने या पिकांची पाहणी करून शेतकºयांना पीक संरक्षणाविषयी व रोगांच्या बिमोडासाठी औषधांची फवारणी कशी करावी, यासाठी मार्गदर्शन करून व होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. 

वाई तालुक्यातील बदलत्या हवामानाचा स्ट्रॉबेरीसह भाजीपाला उत्पन्न घेणाºया शेतकºयांनी अंदाज घेऊनच लागण करावी, तसेच त्यासाठी कृषी विभागाने तालुकास्तरीय मार्गदर्शनाचे कार्यक्रम राबवून योग्य प्रबोधन व्हावे.- जितेंद्र गोळे, शेतकरी, गोळेगाव, ता. वाई 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी