शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:47 IST

कऱ्हाड : सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या ...

कऱ्हाड : सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे व घरगुती वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका महावितरण कंपनीने लावला आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची कोंडी करण्याचे पाप राज्य सरकार करीत आहे. ते त्वरित थांबवावे. वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवावे, अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळेल. सोमवारी (दि. २२) कऱ्हाड तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करणार असल्याचा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत दिला.

पंजाबराव पाटील म्हणाले, कोरोना काळात रात्रंदिन शेतात राबून जनतेला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याला तो संकटात असताना राज्य व केंद्र सरकार मदत करायची सोडून वीज कनेक्शन तोडून अंधाराचे बक्षीस देत आहे, तर त्यांची पिके वाळविण्याचे पाप करीत आहे.

केंद्र सरकार शेतकरी विरोधात कायदे करून शेती व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम करीत आहे, तर दुसरीकडे राज्य सरकार संकटातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहे. त्यामुळे आई जेवू घालिना अन् बाप भीक मागू देईना अशी शेतकरी वर्गाची अवस्था झाली आहे. तरी राज्य सरकारने वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवावे, तोडलेले त्वरित जोडावे. कर्नाटकप्रमाणे शेतीपंपासाठी दिवसा मोफत वीज देण्याचे जाहीर करावे, अन्यथा बळिराजा शेतकरी संघटना २२ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.