शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

आपत्ती व्यवस्थापन कक्ष केवळ लॅण्डलाईन पुरता!

By admin | Updated: June 24, 2015 00:46 IST

पाटण : बैठका घेऊनही फायदा नाही

अरुण पवार - पाटण  -जिल्ह्यात पाटण तालुका म्हटलं की, पाऊस, पूर, भूकंप या आपत्तींनी बाधित तालुका होय. यापूर्वीचे अनुभव व आलेली संकटे पाहता प्रशासनाच्या दृष्टीने अलर्ट राहण्याचे दिवस. तशा सूचना पावसाळा सुरू होण्याअगोदर जिल्हाधिकारी, आमदार, तहसीलदार यांनी खास बैठका घेऊन दिलेल्या आहेत. मात्र पाटण तालुक्यातील यंत्रणा मनावर घेताना दिसत नाही. १ जूनपासून प्रत्येक शासकीय विभागात उघडण्यात आलेले आपत्ती व्यवस्थापन कक्ष केवळ एक लॅण्डलाईन फोनपुरते तेदेखील रजेदिवशी बंद, तसेच तालुक्यात १३ आरोग्य केंद्रे व ६३ उपकेंद्रे असून, कितीही जीव तोडून सांगा; मात्र डॉक्टर मुक्कामी राहत नाहीत. आरोग्य कर्मचारी थांबायला तयार नाहीत. तलाठी, ग्रामसेवकांना तर आपत्तीचे घेणे-देणे नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री आढावे व बैठका काय कामाच्या? आपत्तीवेळी मदतच मिळत नाही, हे विदारक सत्य तालुक्यातील दुर्गम जनतेला ज्ञात आहे. गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण पाटण तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. रस्त्यावरची गावे आणि तेथील लोक अशा पावसातून आपली मूलभूत गरज, बाजारहाट किंवा संपर्क साधतात. मात्र, तालुक्यातील अनेक गावे जंगलात व दुर्गम, डोंगराळ भागात आहेत. तिथे मुसळधार पावसामुळे जनजीवन चांगलेच गारठले आहे. तेथील लोकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यातच वीजपुरवठा खंडित झालेला तो ७२ तास उलटले तरी सुरळीत होत नाही. आजारी माणसाला दवाखान्यात न्यावे तर अशक्यच. कारण जवळपासच्या आरोग्य केंद्रात वेळेवर नसतात. रात्रीच्या वेळी तर दुर्गम भागातील लोकांवर पावसाळ्यात अनेक संकटे येतात. सांगायचे कोणाला, कुणीही मदतीला मदतीला येत नाही. कोयना, मोरणा, ढेबेवाडी विभागातील गावांची पावसाळ्यात अत्यंत वाईट अवस्था असते. गावात आपत्तीकाळात शासकीय यंत्रणा उपलब्ध नसते; मग आरोग्य, वीज किंवा अन्नधान्य मिळत नाहीत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन आहे तरी कुठे? या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आहे का?तालुक्यातील निवी, कुसणी, पळशी, पाणेरी, पांढरेपाणी, हुंबरणे, पाचगणी, मळ्याचा वाडा, मळे-कोळणे, जाईचीवाडी, कारवट, घाणबी वाटोळे, गावडेवाडी, धुईलवाडी, खुडूपलेवाडी, भारसाखळे, जुंगटी, आरल, पिनीत्यावाडा, नेचल, कामरगाव, घाटमाथा, केमसे, भाटोली जोगेटेक अशा अनेक गावांचे पावसाळ्यात काय हाल होतात. याचा आढावा आपत्ती व्यवस्थापनास आहे का? असा सवाल व्यक्त होत आहे.