शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

‘दिलवाले’ लागला; पण शाहरुख नाही दिसला

By admin | Updated: December 19, 2015 01:05 IST

शिवसेनेचा विरोध : असहिष्णुतेसंदर्भातील वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या अन्य संघटनांचीही निवेदन

सातारा : अभिनेता शाहरुख खान याने देशातील असहिष्णुतेच्या वातावरणाबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे नाराज झालेल्या शिवसेनेसह काही संघटनांनी ‘दिलवाले’ या त्याच्या चित्रपटास विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात हा चित्रपट शुक्रवारी (दि. १८) प्रदर्शितच झाला नाही. ‘दिलवाले’ हा चित्रपट राजलक्ष्मी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. तसेच समर्थ चित्रपटगृहातही मॅटिनीचा खेळ होणार होता. तथापि, गुरुवारीच शिवसेनेने आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध दर्शविणारी निवेदने दिली होती. त्यामुळे दोन्ही चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात काय भूमिका घेतात, हे पाहून चित्रपट प्रदर्शित करायचा की नाही, याविषयी निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, ‘दिलवाले’ शुक्रवारी वाईत मात्र कोणत्याही विरोधाविना झळकला. शाहरुख खानच्या वक्तव्यावरून नाराजी पसरल्यानंतर उजव्या संघटना सक्रिय झाल्या होत्या. दि. २ नोव्हेंबर रोजी शाहरुखने हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘धार्मिक असहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षतेला विरोध हे दोन असे गुन्हे आहेत, जे तुम्ही देशभक्त बनूनही करू शकता,’ असे तो म्हणाला होता. त्यानंतर शिवसेनेसह अनेक संघटनांनी राज्यभरात शाहरुखचा निषेध केला होता. ‘दिलवाले’ प्रदर्शित होऊ द्यायचा नाही, असा निर्णयही घेतला होता. (प्रतिनिधी) ‘बाजीराव’ मात्र झळकला इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याच्या आक्षेपावरून पुण्यात ज्या ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाला तीव्र विरोध झाला, तो साताऱ्यात मात्र शुक्रवारी झळकला आणि प्रेक्षकांनी तो पाहण्यास गर्दीही केली. बाजीरावांच्या पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांचे ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या गाण्यावरील नृत्य दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी चित्रित केले असल्याने पुण्यासह इतरत्रही ‘बाजीराव’ला विरोध झाला होता. पुण्यातील सर्व खेळ शुक्रवारी रद्द झाले; मात्र साताऱ्यात खेळ निर्विघ्नपणे पार पडले.